Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक गुन्हे शाखेची घारगाव हद्दीत धडक कारवाई; ५ लाखांच्या मुद्देमालासह अवैध वाळू वाहतूक करणारा आरोपी ताब्यात
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची घारगाव हद्दीत धडक कारवाई; ५ लाखांच्या मुद्देमालासह अवैध वाळू वाहतूक करणारा आरोपी ताब्यात

आरोपीच्या ताब्यातून ५,००,००० रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा विनाक्रमांकचा बडा दोस्त टेम्पो आणि ८,००० रुपये किमतीची वाळू असा एकूण ५,०८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

राजरोसपणे सुरू असलेल्या पठार भागातील अवैध वाळू वाहतुकीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत पाच लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ आणि रोहित येमुल यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती मिळवण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना करण्यात आले होते.

सोमवारी (१८ ऑगस्ट) पथक तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश शेंडगे हा इसम अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पोमधून मांडव्याकडून साकूरकडे अवैध वाळूची वाहतूक करत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील हॉटेल श्रीनाथजवळ सापळा रचला. तेथे आलेला संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी वाहनचालक मंगेश धोंडीभाऊ शेंडगे (वय ३५, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून ५,००,००० रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा विनाक्रमांकचा बडा दोस्त टेम्पो आणि ८,००० रुपये किमतीची वाळू असा एकूण ५,०८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 502
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.