Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप

21/08/2026

दरोड्याचा मोठा कट उधळला: स्थानिक गुन्हे शाखेकडून लक्झरी कार, २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

21/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याचा मोठा कट उधळला: स्थानिक गुन्हे शाखेकडून लक्झरी कार, २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह ५ सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हेगारी

दरोड्याचा मोठा कट उधळला: स्थानिक गुन्हे शाखेकडून लक्झरी कार, २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

जप्त केलेले गावठी कट्टे व काडतुसे त्यांनी श्रीरामपूर येथील फरार आरोपी आसिफ उर्फ आश्यू पठाण आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ५ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडवरील लवणवाडी पाटीजवळ कच्च्या रस्त्याच्या आडोशाला अंधारात थांबलेल्या या संशयितांना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, यामध्ये दोन काळया रंगाच्या आलिशान विनाक्रमांक कार (हुंदाई क्रेटा आणि टाटा हॅरियर), २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे, ६ मोबाईल, लोखंडी टॉमी आणि मिरची पूड अशा मुद्देमालाचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि त्यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहरूख रज्जाक शेख (वय ३४, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (वय २३, रा. टाकळी, ता. कोपरगाव), तन्जीम नदिम शेख (वय २६, रा. येवला, जि. नाशिक), फिरोज चाँद शेख (वय ३५, रा. येवला, जि. नाशिक) आणि रेहान रौफ शेख (वय ३०, रा. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता, शाहरूख शेख आणि इम्रान पठाण या सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी हत्या, दरोडा, जबरी चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी श्रीरामपूर, कोपरगाव, लोणी, शिर्डी व इतर पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.

जप्त केलेले गावठी कट्टे व काडतुसे त्यांनी श्रीरामपूर येथील फरार आरोपी आसिफ उर्फ आश्यू पठाण आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५) सह आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 292
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

आश्वी परिसरात चोरट्यांचा हैदोस; पोलिसांच्या ढिम्म कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप, तक्रारीसाठी ‘उद्या या’ म्हटल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला…

दरोड्याचा मोठा कट उधळला: स्थानिक गुन्हे शाखेकडून लक्झरी कार, २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

21/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.