Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

एकाच ठिकाणी, एकाच वेळेत आणि परस्परविरोधी झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे धांदरफळ गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमाच्या व वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या रक्तरंजित आणि हाणामारीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धांदरफळ बुद्रुक गावातील बाजारतळावरील दांडियाच्या मंडपाजवळ घडली. नवनाथ भास्करराव देशमाने (वय ४१, रा. देशमाने मळा, धांदरफळ बु., ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रशांत बाळासाहेब कोल्हे याने नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडिया कार्यक्रमाकरिता टाकण्यात आलेल्या मंडपाचे नुकसान केले होते. या प्रकारची फिर्यादीने विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव गोळा केला.
या प्रकरणात प्रशांत बाळासाहेब कोल्हे, प्रविण कारभारी कोल्हे, ऋषिकेश कैलास कोल्हे, कमलेश दिलीप डेरे, औंकार आण्णा तोरकडी, प्रणित बंडू गोर्डे, दिलीप श्रीरंग डेरे आणि इतर दोन अनोळखी इसम (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक) यांनी फिर्यादी नवनाथ देशमाने, उज्वला नवनाथ देशमाने, प्रशांत प्रविण देशमाने व नवनाथ विठ्ठल नाईकवाडी यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लोखंडी फायटर व चाकू यांसारख्या घातक हत्यारांनी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची सोनसाखळी बळकावून नेल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर. एम. लांघे हे करत आहेत.
याच घटनेची दुसरी बाजू समोर येत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच वेळेत आणि ठिकाणी परस्परविरोधी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कारभारी कोल्हे (वय २९, रा. कारमळा, धांदरफळ बु., ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते व त्यांचे साक्षीदार मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाजारतळावर आले होते. त्या वेळी नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, प्रशांत देशमाने, विशाल काळे, अजिंक्य क्षीरसागर आणि इतर दोन अनोळखी इसमांनी (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक) एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना विनाकारण शिवीगाळ केली.
बेकायदेशीर मंडळी जमवून आरोपींनी चाकू, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करत फिर्यादी स्वतः, प्रशांत कोल्हे, ओंकार तोरकडी, ऋषिकेश कोल्हे व कमलेश डेरे यांना जबरदस्त मारहाण केली. तसेच साक्षीदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी व घड्याळ जबरदस्तीने काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. के.उगले करत आहेत.
एकाच ठिकाणी, एकाच वेळेत आणि परस्परविरोधी झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे धांदरफळ गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 307
हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.