Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन
दुर्दैवी

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

जनसेवेची आवड असलेला एक सक्रिय विधिज्ञ आणि उमदा राजकीय कार्यकर्ता असा अचानक निघून गेल्याने संगमनेरसह मांडवे बुद्रुक परिसरात शोककळा पसरले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातून अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक आणि नामांकित विधिज्ञ अमित धुळगंड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडनजीक असलेल्या ऐतिहासिक अंकाई गडावर दर्शनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. या आकस्मिक घटनेमुळे मांडवे बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ॲड. अमित धुळगंड हे धार्मिक वृत्तीचे असल्याने बुधवारी भल्या पहाटे अंकाई गडावर दर्शनासाठी गेले होते. अत्यंत उत्साहात गड चढून वर गेल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गड माथ्यावरच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मित्रपरिवारासह सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला.
ॲड. अमित धुळगंड यांनी वकिलीच्या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता. कायदेशीर बाबींवर त्यांचे प्रभुत्व होतेच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक म्हणून ते पक्षसंघटनेत योगदान देत होते. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे एकनिष्ठ व खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात विशेष ओळख होती.
केवळ वकिली आणि राजकारण पुरते मर्यादित न राहता सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांत त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. आपल्या मनमिळाऊ आणि कार्यतत्पर स्वभावामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जनसेवेची आवड असलेला एक सक्रिय विधिज्ञ आणि उमदा राजकीय कार्यकर्ता असा अचानक निघून गेल्याने संगमनेरसह मांडवे बुद्रुक परिसरात शोककळा पसरले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 366
अमित धुळगंड दुखद निधन निधन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

By Annant Ppangarkar21/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातून अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय…

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026

“सर्व अडचणी दूर होऊन जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदो!”; नवरात्रोत्सवात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावूक प्रार्थना

20/10/2026

संगमनेरात विजयादशमीला आरएसएसचे पथसंचलन! स्वयंसेवकांच्या रुपात आमदार अमोल खताळ पाटलांची एन्ट्री

20/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.