Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली ही मागणी
गुन्हेगारी

संगमनेरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली ही मागणी

संगमनेरात झाली पाच दुचाकींची चोरी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 14, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक दुचाकी चोऱ्या आणि प्रवाशांना लुटण्याचे प्रकार संगमनेरमध्ये सर्रासपणे घडत आहेत. येथील बस स्थानकामधून आरोपींना कुठेही तातडीने निघून जाता येते, त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी बसस्थानकामधील पोलीस चौकी पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातून भर रस्त्यावर तसेच बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाकींच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकींचा चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसते. बस स्थानकाचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टपोरी मुले नाहक त्रास देण्याचे काम करत असतात. मग ती मुलींची छेडछाड असेल किंवा कॉलेजच्या मुलांना धमकावणे असे प्रकार घडत असल्याने अशा गुन्हेगारी ढोलकीच्या लोकांना तातडीने कारवाई व्हावी यासाठी संगमनेर बस स्थानकामधील पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. निवेदनातील मागणीवर तातडीने कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने या टपोरी गॅंगचा समाचार घेईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, उपाध्यक्ष तुषार बढे, अभिजित घाडगे, संग्राम हासे, महेश उदमले, आकाश भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एकाच दिवसात तालुक्यातून पाच दुचाकी चोरी

घटना १ :- नितीन प्रमोद दहे, रा. पोखरीहवेली, ता. संगमनेर यांची १० हजार रूपये किंमतीची बजाज सीटी मोटार सायकल क्र. एम. एच १७ सीई ५८४३ ही अज्ञात चोरटयाने राहत्या घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना २ :- अमोल सोपान घुले, रा. स्ट्रॉबेरीरोड, घुलेवाडी, संगमनेर यांची १० हजार रुपये किंमतीची होंडा मोटारसायकल क्र. एम. एच. १७ बीई २८८३ ही अज्ञात चोरटयाने चोरून नेली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना ३ :- योगेश सोमनाथ साळी, रा. साळीवाडा, संगमनेर यांची १० हजार रुपये किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम. एच. १७ एए २८६५ ही आयडीबीआय बँक येथून अज्ञात चोरटयाने चोरून नेली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना ४ :- बाळासाहेब तुकाराम घुले, रा. रहाणेमळा, बाफना मेडीकलमागे, संगमनेर यांची १० हजार रुपये किंमतीची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम. एच. १६, ७६१६ ही घरासमोरून अज्ञात चोरटयाने चोरून नेली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना ५ :- अविनाश रावसाहेब खेमनर, रा. चणेगाव, ता. संगमनेर यांची १५ हजार रुपये किंमतीची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम. एच. १७ बीए ४५०८ ही दत्तात्रय दशरथ खेमनर यांच्या जनावरांच्या गोठयातून अज्ञात चोरटयाने चोरून नेली. याप्रकरणी आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 105
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.