Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बुधवारी संगमनेरात रंगणार दिवाळी पहाट गाणी
क्रिडा व कला

बुधवारी संगमनेरात रंगणार दिवाळी पहाट गाणी

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 25, 2022Updated:October 25, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आणि पहाट गाणी ही संकल्पना संगमनेरमध्ये रुजविणारा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता भंडारी मंगल कार्यालयात होणार आहे.

संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाला संगमनेरकर रसिकांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. या वर्षी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, संगमनेरच्या भूषण गुलाबबाई संगमनेरकर हे महान कलाकार आपल्यातून गेल्याने, शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने तसेच दिवाळी पहाट गाणी ही संकल्पना संगमनेरमध्ये रुजविणारे दिवंगत कलारसिक नेते प्रेमानंद रुपवते यांच्या स्मृतीदिनानिमित्त या सर्वांना दिवाळी पहाट गाण्यातून सांगितिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष देवीदास गोरे यांनी दिली आहे.

डॉ. संतोष खेडलेकर यांची संकल्पना व निवेदन असलेल्या या कार्यक्रमात विकास भालेराव, शीतल सराफ–पोतदार, धर्मेंद्र अभंग, अनुजा सराफ हे मराठी हिंदी गाणी सादर करणार आहेत. सत्यजित सराफ हे संगीत संयोजन करणार आहेत.

यावेळी झी मराठी वाहिनीवरील सारेगम लिटील चॅम्प कार्यक्रमात उपविजेता ठरलेल्या संगमनेर येथील सारंग भालके याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रक कांचनताई थोरात,  माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, धनश्री कैलास सोमाणी यांच्यासह संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, डॉ. अरविंद रसाळ, अशोकराव सराफ यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 108
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

April 22, 2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

March 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.