Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातची निवडणूक अखेर जाहीर १ आणि ५ डिसेंबरला १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान
महाराष्ट्र संवाद विशेष

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातची निवडणूक अखेर जाहीर १ आणि ५ डिसेंबरला १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान

हिमाचल प्रदेश सोबतच ८ डिसेंबरला होणार मतमोजणी; केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत घोषणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली आणि पंतप्रधानांचे होमपीच असलेली गुजरातची निवडणूक अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. १८२ जागांसाठी दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे.

या निवडणुकीचा निकाल हिमाचल प्रदेश सोबत म्हणजेच ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर केल्या आहेत. एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे.

हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होत असून हिमाचल आणि गुजरातची मतमोजणी एकाच दिवशी ८ डिसेंबरला होईल.

४.९ कोटी मतदार असून यात ४.६ कोटी युवा मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत युवकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे गुजरातचा मुख्यमंत्री आणि सत्ता कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय युवा वर्गाच्या हाती असेल.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ९९ जागांवर विजय मिळविला होता तर विरोधी ठरलेल्या काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळविला. याशिवाय दोन जागांवर भारतीय ट्रायबल पार्टी, एका जागेवर एनसीपीचा उमेदवार विजयी झाला होता. शिवाय तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १६ जागांवर फटका बसला होता. काँग्रेसच्या खात्यात या जागा वाढल्या होत्या.

आता दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आम आदमी पार्टी काटे की टक्कर देणार असून भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस सोबतच आपने भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. आम आदमी पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्यता चाचणी कलांमध्ये दिसून येत आहे. आम आदमी पार्टीच्या निवडणुकीतील जोरदार एंट्रीने निवडणुकीतील समीकरणे बदलण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली व पंजाब प्रमाणेच गुजरातमध्ये मोफत वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशी आश्वासने दिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या होमपीच वर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 111
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.