Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जाळला जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंचा पुतळा शिवसेनेत अंतर्गत असंतोषाला खतपाणी घातल्याचा आरोप
आंदोलन

संगमनेरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जाळला जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंचा पुतळा शिवसेनेत अंतर्गत असंतोषाला खतपाणी घातल्याचा आरोप

जिल्हाप्रमुख खेवरे हटाव शिवसेना बचाव कार्यकर्त्यांची नवी भूमिका
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शिवसेना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवत शनिवारी सकाळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेला काही दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत खदखद यामुळे समोर आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले होते. यात काही पदाधिकाऱ्यांचे पद काढून घेण्यात आले होते. तर त्यांचा पदभार नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत म्हणविणारे नाराज झाले. पदच्युत झालेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्यावरील आपल्या निष्ठा कायम ठेवत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.

मात्र दरम्यानच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात थेट संपर्कप्रमुखां विरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली एकीकडे जिल्हाप्रमुखांवर निष्ठा दाखविणारे आंदोलन दुसरीकडे पक्षविरोधी कारवाया करण्यात पुढे होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून जाहीर झालेल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची आफत पक्षावर ओढावली होती. त्यामुळे या अंतर्गत वादाला जिल्हाप्रमुख खेवरे यांनीच खतपाणी घातल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आज नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवत थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. बस स्थानक चौकात एकत्र जमलेले या कार्यकर्त्यांनी प्रमुख जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाळत, ‘खेवरे हटाव’ शिवसेना बचाव’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. नव्याने नेमलेली कार्यकारिणी ही जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या मर्जीप्रमाणे नसल्याने नवीन कार्यकारिणीस स्थगिती देण्यासाठी खेवरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ज्यांना पदे मिळाली नाही, त्यांची माथी भडकविण्याचे काम त्यांनी केले. खेवरे यांच्या सांगण्यावरूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात आंदोलने झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी आणि रोष व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या स्वतःच्या तालुक्यात एकही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य नाही. राहुरी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेत एकही नगरसेवक निवडून आणणाऱ्या जिल्हाप्रमुखांच्या विरोधात आंदोलन असल्याचे म्हटले आहे.संगमनेर मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा शिवसैनिकांनी जाळत खेवरे हटाव शिवसेना बचावच्या घोषणा दिल्या

आज संगमनेर येथे शिवसेना, युवा सेनेच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला. या आंदोलनात आम्ही कार्यकर्ते सहभागी होतो. तसेच संपर्कप्रमुख व शिवसेनानिष्ठ असलेले बबन नाना घोलप यांचा ज्यांनी निषेध केला, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमची संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्याच्या युवकांची मागणी आहे की खेवरे हटाव शिवसेना बचाव.

सचिन साळवे, शिवसैनिक.

 

संगमनेर मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखांविरोधात पुतळा जाळण्याचे आंदोलन केले. यात आम्ही पदाधिकारी सहभागी नव्हतो. त्यामुळे आंदोलनाचे अधिक माहिती नाही माहिती मिळाल्यावर आपणास देतो.

अमर कतारी, शिवसेना शहर प्रमुख.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 132
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.