Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाचा निधी इतरत्र वळविल्याने शिक्षण संचालकांकडून कारणे दाखवा नोटीस
शिक्षण

प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाचा निधी इतरत्र वळविल्याने शिक्षण संचालकांकडून कारणे दाखवा नोटीस

जिल्हा परिषद शिक्षकांना दीपावली उलटली तरी ऑक्टोंबरचे पगार नाही; नगर मधील शिक्षक संघटनाकडून दुर्लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन विहित मुदतीत न दिल्याच्या कारणावरून आणि उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करत शासनाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावरून तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. असे असताना देखील राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही. पुरेसे अनुदान उपलब्ध करून देऊन देखील वेळेत शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे.

वितरित करण्यात आलेले अनुदान हे केवळ नियमित वेतनासाठी देण्यात आले होते त्यातून अन्य कोणतीही देयक अदा केली जाऊ नयेत अशा स्पष्ट सूचना देखील संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे पगार वेळेत न झाल्याने याची विचारणा केली असता शिक्षण अधिकाऱ्यांनी पुरेसे अनुदान प्राप्त झालेले नाही, त्यामुळे वेतन अदा करता येत नसल्याचे शिक्षक संघटनांना सांगितले होते.

वास्तविक शिक्षण अधिकाऱ्यांनी वितरित केलेल्या रकमेतून इतर देयक वैद्यकीय देयक सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अक्रम सण थकित महागाई भत्ता देयके आणि फेब्रुवारीचे थकित वेतन अदा केल्याची बाब गंभीर असल्याचे शिक्षण संचालकांनी आपल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडून येत्या 14 तारखेपर्यंत खुलासा मागविण्यात आला आहे. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरातील प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या या कारणे दाखवा नोटीस मुळे राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे.

अशी आहे अहमदनगरची स्थिती

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बारा हजारावर शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची २०१२-१३ पासून शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन बिले तयार केली जातात. पगार बिले वेळेवर करून सुद्धा आजपर्यंत शिक्षकांचे पगार महिन्याच्या पाच तारखेच्या आत होत नाहीत.

यातच दिवाळी ॲडव्हान्स व माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार दीपावली सणाच्या आगोदर करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊनसुद्धा जिल्हा परिषद शिक्षक पगार व सण ॲडव्हान्सपासून अद्याप वंचित आहेत.

सण होऊन गेला ॲडव्हान्स कशाला द्यायचा? तसेच पगारासाठी निधीच उपलब्ध नाही असे अर्थ विभागाचे म्हणणे आहे. शिक्षकांच्या पगाराची ही कहाणी अनेक शिक्षक नेत्यांना माहिती असून सुद्धा कोणीच लक्ष घालत नाही. सर्व शिक्षक संघटना शिक्षक बँक निवडणुकीनंतर झोपेचे सोंग घेतले सारखे करत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांवर होत आहे. पगार महिन्याच्या १ तारखेला करण्याबाबद अनेक परिपत्रके आलीत व गेलीत पण पगार कधीच वेळेवर होत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.