Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मागितले ५ लाख घेतले २ लाख; लाचखोर महिला तहसिलदार मध्यस्थासह लाचलुचपतच्या जाळ्यात
प्रशासन

मागितले ५ लाख घेतले २ लाख; लाचखोर महिला तहसिलदार मध्यस्थासह लाचलुचपतच्या जाळ्यात

तहसिलदार मॅडमकडे मिळाली १ कोटीहून अधिक रोकड आणि ६० तोळे सोने
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याव नोंद करण्याचे आदेश देण्यासाठी मॅडमनी एका मध्यस्थाच्या मार्फत तब्बल ५ लाखाची लाच मागितली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम ३ लाखावर आली आणि २ लाख रुपयांची रोकड स्विकारतांना मध्यस्थ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. मध्यस्थ जाळ्यात अडकताच तहसिलदार मॅडमच्या घरी लाच लुचपतने छापा टाकला आणि मॅडमलाही ताब्यात घेतले. नंतर मॅडमच्या घराची झडती घेतली असता तेथे ७५ हजाराची तर मुंबईतील विक्रोळी येथील घरात एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली. संपत्तीची मोजदाद सुरु केल्यानंतर मॅडमकडे तब्बल ६० तोळे सोने असल्याचे आढळून आले.

एखाद्या सामान्य अधिकाऱ्याची ही कथा नाही तर ती आहे अलिबागच्या महिला तहसिलदारांची. मिनल कृष्णा दळवी (वय ४९ वर्षे) असे या लाचखोर तहसिलदारांचे नांव असून राकेश रमाकांत चव्हाण (वय ४९ वर्षे) असे मध्यस्थ एजंटाचे नांव आहे. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दोघाही लाचखोरांना अटक केली आहे. दळवी यांना अटक केल्यानंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होवू लागल्याने ताबडतोड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील मांडवा कोळगांव येथील जमिनीच्या बक्षीसपत्राच्या नोंदीचे प्रकरण तहसिलदार मीनल दळवी यांच्याकडे दाखल झाले होते. सातबारावर नोंद करण्यासाठी तहसिलदार दळवी यांनी संबधीताच्या नातेवाईकाकडे आधी पाच लाख व नंतर तीन लाखाची लाच मागितली होती. दोन लाखावर तडजोड झाल्यानंतर दळवी यांनी सदरची रक्कम एजंट राकेश चव्हाण याच्याकडे देण्यास सांगीतले होते. त्यामुळे तक्रारदाराने २८ सप्टेंबरला नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करत तक्रार नोंदविली होती. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी २९ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर) एजंट चव्हाण हा लाचेची रक्कम स्विकारण्यासाठी तक्रारदाराच्या मोबाईल विक्रीच्या दुकानात आला होता. तेथे सायंकाळी लाचेची रक्कम स्विकारतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर दळवी यांना त्यांच्या राहत्या घरुन ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने अलिबागच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याशिवाय दळवी यांच्या विक्रोळी येथील घरातून मोठे घबाड तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. एक कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच काही महत्वाचे दस्तावेज तपास यंत्रणेला मिळाले असून अलिबागच्या घरात ६० तोळे सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक नवी मुंबई विभागाच्या पोलीस ज्योती देशमुख यांनी दिली आहे. शनिवारी दोन्ही लाचखोरांना न्यायालयात आणले असता विशेष सत्र न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सोमवारपर्यत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 227
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.