महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मागील दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. नुकताच सन २०२१ -२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे.
ज्येष्ठ मुक्त पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षक, वेगवेगळ्या आस्थापनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना हा पदविका अभ्यासक्रम उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम लेखन कौशल्य, दूरचित्रवाणीवरील विविध कामकाज, नभोवाणीसाठी अवाश्यक कौशल्ये, मराठी भाषेचा सुयोग्य वापर आदी गोष्टी यात शिकवल्या जातात.
पदवीधर युवक युवती ते सत्तरीतील नोकरी किंवा व्यवसाय करणारांचा या अभ्यासक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभतो त्यामुळे अशा लोकांच्या सोयीसाठी या अभ्यासक्रमाचे वर्ग केवळ रविवारीच आयोजित केले जातात. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी संगमनेर महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी प्रा. सुशांत सातपुते (९७६६७ ६०९२६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी केले आहे. 

