Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लबच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यावरील विद्यार्थ्यांच्या हातात आले टॅब
शिक्षण

रोटरी क्लबच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यावरील विद्यार्थ्यांच्या हातात आले टॅब

रोटरीने संगमनेर-अकोले तालुक्यात केले एक कोटी रुपयांच्या ६६५ शैक्षणिक टॅबचे वितरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या रोटरी क्लबने संगमनेर-अकोले तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर, दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी, ३७ शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी ६६५ शैक्षणिक टॅब वितरित केले.

रोटरी क्लब तैवान आणि रोटरी क्लब पुणे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला गेला आहे. टॅब वितरण व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मालपाणी लॉन्स येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नॉर्थ क्लबचे अध्यक्ष गिरीश कोणकर, केतन जोशी, पीडीजी ओमप्रकाश मोतीपवळे, एजी गौरव भुजबळ यांच्यासह संगमनेर रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सचिव आनंद हासे, रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र डावरे, प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी, सुनिल घुले, योगेश गाडे, पवनकुमार वर्मा आदींसह शाळांचे शिक्षण व लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

रो. गिरीष कोणकर यांनी टॅब प्रकल्पामागची पार्श्वभूमी, हा प्रकल्प कसा सुरु झाला व राबविला गेला याची माहिती दिली. तसेच शिक्षकांनी टॅब वापरण्याविषयी तसेच टॅबचा जास्तीत जास्त वापर कसा केला जावा, याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी डिस्ट्रीक्ट ३१३२ मध्ये दिलीप मालपाणी यांनी वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना मिळालेल्या सर्वोत्कृष्ट एजी पुरस्काराबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

ऋषिकेश मोंढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक यांना टॅबसारख्या आधुनिक उपकरणांमुळे शिक्षणाची अधिक गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित काकडे, संजय कर्पे, डॉ. किशोर पोखरकर यांनी केले, तर आभार अमित पवार यांनी मानले. प्रकल्प यशस्वीततेसाठी महेश वाकचौरे, दिपक मणियार, रविंद्र पवार, विश्वनाथ मालाणी, मोहित मंडलिक, महेश ढोले, संकेत काजळे, मयुर मेहता, डॉ. सागर गोपाळे, अण्णासाहेब थोरात व सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.

अतिशय दर्जेदार व संपूर्ण शालेय अभ्यासक्रम असलेले टॅबमुळे जिल्हा परिषद शाळांना, विशेषतः द्विशिक्षकी शाळांना ह्या टॅबद्वारे मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळेल. टॅब हाताळण्याचा सरावामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आकलन शक्ती, विषय ज्ञान निश्चितच वाढेल. हे विद्यार्थी जगाच्या कोपऱ्यात जरी असेल, तरी ते जगाबरोबर निश्चितच राहतील आणि असा विश्वास आहे. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 130
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.