Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अरेच्चा; स्थानिक पोलिस करतात काय? गुंजाळवाडीतील हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा
गुन्हेगारी

अरेच्चा; स्थानिक पोलिस करतात काय? गुंजाळवाडीतील हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा

५५ हजाराच्या मुद्देमालासह आरोपींवर गुन्हा दाखल, प्रतिष्ठीत घरातील व्यक्तींचा आरोपीत समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेरात स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्यात आता हुक्का पार्लरचा समावेश झाला आहे. शहरालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संगमनेरात येत टाकलेल्या या छाप्यामुळे प्रतिष्ठीतांचे हुक्का पिण्याचे शौक समोर आले आहेत. पथकाच्या छाप्यात ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हाती लागला असून नऊ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नंतर आरोपींची मुक्तता करण्यात आली.

शहरालगत गुंजाळवाडी शिवारात सुरु असलेल्या या हुक्का पार्लरकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असतांना याची माहिती थेट नगरच्या गुन्हे विभागाला मिळाल्यावर त्यांचे पथकच मंगळवारी रात्री संगमनेरात दाखल झाले. या पथकाने हॉटेल ग्रीन लीप शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विना परवाना सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. छाप्यावेळी तेथे हुक्का पिणाऱ्या आरोपीत शहरातील प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याचे दिसून आले. छापा टाकणाऱ्या पथकाने आरोपींना ताब्यात घेत हुक्का पार्लरची झाडाझडती घेतली. यावेळी २७ हजार रुपये किमतीचे हुक्का पिण्यासाठी लागणारे तेरा रबरी पाईप, विविध कंपन्यांचे अर्धवट वापरलेले सुगंधी केमिकलचे डबे आणि साहित्यासह एकूण ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

कारवाईचे सोपस्कर पार पडल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिराने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणिज्य व्यवहार व पुरवठा व वितरण) अधिनियमाच्या सुधारीत कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उगले यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून तपासातून अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान तत्कालिन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानेदेखील काही दिवसांपुर्वी हुक्का पार्लरवर टाकलेल्या छाप्याला यामुळे उजाळा मिळाला. मात्र हुक्का पार्लर बंद करण्यात त्यांनादेखील अपयश आल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील हुक्का बहाद्दर ९ आरोपीत यांचा आहे समावेश

विना परवाना हुक्का पार्लर चालविणाऱ्या संतोष अशोक वांढेकर (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी) याच्यासह संकेत नारायण कलंत्री (रा. बाजारपेठ, ता. संगमनेर), गणेश शिवप्रसाद लाहोटी (रा. शिवाजीनगर, संगमनेर), श्रेयस श्रीकांत मणियार (रा. स्वातंत्र चौक, संगमनेर), ऋषी संतोष आव्हाड (रा. शिवाजीनगर, संगमनेर), अनिकेत चंद्रकांत खोजे (रा. गणेशनगर, संगमनेर), जयनेश धर्मेंद्र शहा (रा. बाजारपेठ, संगमनेर), सागर मोहन पंजाबी (रा. विद्यानगर, संगमनेर) आणि प्रसाद मयय्या गुंडेला (रा. इंदिरानगर, संगमनेर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 129
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.