Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात डमी राज्यपाल कोश्यारी छत्रपतीसमोर झाले नतमस्तक; शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
आंदोलन

संगमनेरात डमी राज्यपाल कोश्यारी छत्रपतीसमोर झाले नतमस्तक; शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/11/2022Updated:21/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

यापुढे बेताल वक्तव्य कराल तर राज्यात फिरू देणार नाही; तुमचं धोतर फेडल्याशिवाय राहणार नाही

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी अनोखे आंदोलन केले. डमी राज्यपालांच्या वेशात धोतर, टोपी आणि कोट घालत आंदोलन स्थळी आलेले शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत राज्यपाल कोश्यारी छत्रपतींची माफी मागत असल्याचा प्रसंग उभा केला.

वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळे टीकेचे लक्ष होणारे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच “शिवाजी महाराज हे जुन्या काळचे आदर्श होते” असे वादग्रस्त विधान करून पुन्हा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. कोश्यारी यांच्या पाठोपाठ भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी याने देखील छत्रपती बद्दल गरळ आहे. या दोघांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध सुरू असताना संगमनेर देखील शिवसेना ठाकरे गटाने बस स्थानक चौकात हे आंदोलन केले. आंदोलकांनी राज्यपालांना भाज्यपाल असे संबोधत कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

कधी “समर्थ के बिना कौन शिवाजी को पुँछेंगा” तर कधी “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर मुंबईत पैसा शिल्लक राहणार नाही, त्यामुळे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी देखील कुणी म्हणणार नाही” अशी वादग्रस्त विधाने या पूर्वीही राज्यपालांनी केली. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये पुन्हा असेच बेताल वक्तव्य करत छत्रपतींची तुलना नितीन गडकरी, शरद पवारांशी केली. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष राज्यभर त्यांचा निषेध करत आहे.

आंदोलनावेळी शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांच्यासह सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर प्रमुख कतारी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, नागपूरचे संपर्कप्रमुख नरेश माळवे, गोविंद नागरे यांनी आपल्या भाषणातून इशारा दिला की, राज्यपाल कोश्यारी यांनी जर पुन्हा अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केले तर, त्यांना महाराष्ट्रात छत्रपतीप्रेमी मावळे शिवसैनिक फिरू देणार नाही, त्यांच धोतर फेडल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, इम्तियाज शेख, कार्याध्यक्ष दिपक साळुंके, फैसल सय्यद, महिला आघाडीच्या सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, संगीता गायकवाड, युवासेनेचे गोविंद नागरे, सुदर्शन इटप, अक्षय बिल्लाडे, फरोज कतारी, संकेत खुळे, वैभव अभंग, संभव लोढा, पठार भागाचे ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, एस. पी. रहाणे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवासेना विधानसभा प्रमुख राजू सातपुते, अक्षय गाडे, लक्ष्मण सोन्नर, निलेश रहाणे, शिवसेना शाखाप्रमुख अजीज मोमीन, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, कार्यालयीन प्रमुख बंडू म्हाळस, रिक्षासेनेचे बढे, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी, शहर समन्वय असिफ तांबोळी, अक्षय गुंजाळ, नारायण पवार, निलेश गुंजाळ, प्रकाश चोथवे, विभागप्रमुख विजय भागवत, जयदेव यादव, दानिश पारवे, अल्ताफ शेख, प्रतीक मिसाळ उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 151
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.