Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील व्यापाऱ्याची गुजरातच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 29 लाखाची फसवणूक
गुन्हेगारी

संगमनेरातील व्यापाऱ्याची गुजरातच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 29 लाखाची फसवणूक

पोलीस उपाधीक्षकांच्या आदेशावरून गुजरातच्या व्यापाऱ्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा राजकीय मुद्दा कळीचा बनलेला असताना आता गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला फसविले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माहिती अशी, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा. निंबाळे, ता. संगमनेर) हे गुजरात सह अन्य राज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटो माल देत असतात. अशाच पद्धतीने त्यांनी गुजरात मधील सब्जीमंडी थरा ता. डीसा जि. बनासकांता येथील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना गेल्या वर्षी टोमॅटो विक्री केली होता. मात्र या मालाच्या रकमेपैकी मंडळांनी 22 लाख 36 हजार 663 रुपयांची रक्कम मेहत्रे यांना अदा केली नाही.

मंडोरा यांनी सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मेहेत्रे यांनी तेथील दुसरे व्यापारी योगेश कुमार पिराजी सोळंकी यांच्या मध्यस्थीनंतर 2022 साली पुन्हा मंडोरा यांना 6 लाख 50 हजार 936 रुपयांच्या टोमॅटोची विक्री केली. त्यामुळे मेहेत्रे यांची थकबाकी 29 लाखावर जाऊन पोहोचली. मेहेत्रे यांनी वारंवार मंडोला यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे.

व्यापारी मंडोरा याच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहेत्रे यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यासंदर्भात तक्रार करत रक्कम वसुलीसाठी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर यांनी थरा (गुजरात) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पत्रव्यवहार केला. मात्र तरीदेखील अल्पेश कुमार मंडोरा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच रक्कमही अदा केले नाही, त्यामुळे व्यापारी मेहत्रे यांनी संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुजरातमधील व्यापारी अल्पेश कुमार मंडोरा याच्या विरोधात 29 लाखाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 109
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.