Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्र केसरीसाठी अकोलेमध्ये दोन दिवस रंगणार कुस्त्यांचा थरार
क्रिडा व कला

कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्र केसरीसाठी अकोलेमध्ये दोन दिवस रंगणार कुस्त्यांचा थरार

अहमदनगर जिल्ह्यातुन निवडणार पैलवान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अकोले तालुका तालीम संघाच्यावतीने आणि अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोलेत रविवार (ता. २७) आणि सोमवारी (ता. २८) कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी पैलवानांची निवड केली जाणार असल्याची माहिती अकोले तालुका तालीम संघाचे तालुका अध्यक्ष बबलू धुमाळ, उपाध्यक्ष शामराव शेटे यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार आहेत. आमदार प्रा. राम शिंदे, भाजपा अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रा. एस. झेड. देशमुख, ॲड. श्रीराम गणपुले, जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोरक्षनाथ बलकवडे, भाजप उपजिल्हाध्यक्ष गिरजाजी जाधव, जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते, जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजाभाऊ गोडसे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी यंदा खुल्या पध्दतीने निवड केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड करण्यासाठी या स्पर्धा दि २७ व २८ रोजी अकोले शहरात होणार असून गादी आणि माती विभागात या निवडी केल्या जाणार आहेत. दि. २७ रोजी गादी विभाग व दि. २८ रोजी माती विभागासाठी स्पर्धा होणार आहेत. यापूर्वी तालुक्यातच मल्ल भिडायचे. त्यामुळे एखादा चांगला मल्ल असेल तर तो तालुक्यातच पराभूत झाला तर त्याला पुढे संधी मिळत नसे. त्यामुळे या वर्षी खुल्या पध्दतीने निवड चाचणी स्पर्धा ठेवल्यामुळे सर्वाना समान संधी मिळणार आहे.

निवड चाचणीमध्ये वरिष्ठ विभागातील जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना यात सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तालुका तालीम संघाच्या तालुकाध्यक्षांच्या सहीचे ओळखपत्र बंधनकारक आहे. या कुस्ती स्पर्धेचे निवेदन ३२ वर्षे ४००० मैदाने आपल्या आवाजाने गाजविणारे कुस्ती निवेदक कोल्हापूर येथील पै. शंकर पूजारी हे करणार आहेत.

निवड चाचणीसाठी वजनगट

महाराष्ट्र केसरी गटासाठी एक गट आहे, त्याशिवाय 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 या गटामध्ये स्पर्धा होणार आहे. वजनासाठी वेगवेगळी वेळ निश्चित केलेली आहे. गादी विभागातील निवड चाचणी दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११.३० तर माती विभागातील निवड चाचणी दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 155
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.