Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव डोंगरे, उपाध्यक्षपदी सुनील कडलग
शेती व सहकार

संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव डोंगरे, उपाध्यक्षपदी सुनील कडलग

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
नुतन पदाधिकाऱ्यांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

 

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव विष्णू डोंगरे यांची तर उपाध्यक्षपदी सुनील कडलग यांची निवड झाली.

संघाच्या अतिथीगृहामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या देखरेखीखाली व आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या.

अध्यक्षपदासाठी डोंगरे यांच्या नांवाची सूचना दिलीप वर्पे यांनी मांडली. शिवाजी दिघे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी कडलग यांच्या नांवाची सूचना सचिन दिघे यांनी मांडली. त्यास तुकाराम कोठवळ यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक साहेबराव बारवे, दिलीप वर्पे, बाळकृष्ण होडगर, अड. ज्ञानेश्वर सांगळे, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे, शिवाजी दिघे, तुकाराम कोठवळ, सचिन दिघे, प्रभाकर सोनवणे, महादू खेमनर, संजय क्षीरसागर, मंगल ठाकरे, प्रभावती ढोकरे, व्यवस्थापक अनिल थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, निखील पापडेजा, कार्यालय अधीक्षक बी. एन. काळे आदी उपस्थित होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पश्चात त्यांच्या आदर्श तत्वावर, कॉग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली शेतकी संघाने गौरवास्पद वाटचाल केली आहे. या शेतकी संघाचा कारभार राज्यातील शेतकी संघासाठी अनुकरणीय ठरला आहे. राज्यातील अनेक शेतकी संघ आज मोडकळीस आले असतांना संगमनेरचा संघ मात्र काटकसर, पारदर्शकता, आधुनिकता, शिस्तबध्दता यामुळे प्रथम क्रमांकावर आहे. शेतकी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूकदेखील बिनविरोध पार पडली असून त्यापाठोपाठ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीदेखील बिनविरोध झाल्या आहे.

नुतन पदाधिकाऱ्यांचा आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 227
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.