Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल चालकांसह पिणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल चालकांसह पिणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैध दारुविक्रीविरोधात तक्रार करायचीय, तर मग घ्या हा क्रमांक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 25, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबे, चायनीज गाड्यांसह सहा अवैध मद्य विक्रेत्यांसह पिणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यात अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री व मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.

अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर तसेच अवैधरित्या मद्य पिणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशावरुन नगर जिल्ह्यात कारवाया सुरु करण्यात आल्या आहे. मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जागामालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यात नगरच्या हॉटेल साहिबाच्या मालकास २५ हजार रुपयांचा दंड, तेथे मद्य पिणाऱ्या चार जणांना प्रत्येकी १ हजार रुपये दंड, शेवगांव-पैठण रोडवरील खानापूर येथील हॉटेल पंजाबी ढाबा येथे मद्य पिणाऱ्या तीघा जणांकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड, नेवासे येथील घोडेगाव-कुकाणे रोडवरील हॉटेल विजय येथे मद्य पिणाऱ्या तिघांना प्रत्येकी दीड हजार रुपये दंड आकारण्यात आला असून नगरच्या सावेडीमधील हॉटेल संकल्पच्या चालकास २५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. याशिवाय येथे मद्य पिणाऱ्या ९ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अकोले तालुक्यातील खिरविरे येथील हॉटेल शेवटी नसीबच्या मालकास देखीलल २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून तेथे मद्य पिणाऱ्या तीघांकडून प्रत्येकी १ हजार, नगरच्या मनोहर वाईन्सशेजारील हॉटेल चंद्रमा व नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल जत्रा यांच्यावर कारवाई करत यासंबधी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

अवैध मद्य विक्रीवर जिल्ह्यात कारवाई सुरु राहणार असून अवैध मद्य विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया सुरु आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून आपल्या गावात अथवा परिसरात अवैध मद्यविक्री सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ८४२२००११३३ या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 96
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा…

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.