महाराष्ट्र संवाद न्यूज
बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला.
अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न देखील केले. त्यानंतर लग्न संबंधातून या मुलीला गर्भधारणा झाली. दरम्यानच्या काळात चालक असलेल्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असल्याचे तिने दिलेल्या माहितीतून समोर आले.
या प्रकारातून बालविवाह कायद्याचे ऐसी तैसी झाल्याचे समोर आले असून अवघ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत लग्न केल्याचा गुन्हा तिच्या मृत पतीवर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
असा झाला या प्रकाराचा उलगडा
खेड तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एक बारा वर्षाची मुलगी पोटात दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी आली होती. तपासणी आणते ती गरोदर असल्याचे उघड झाले. त्यामुळे तिच्याकडे आधी चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीतून ही घटना समोर आली आहे.


