Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पारेगावच्या बाप कंपनीतील धक्कादायक प्रकार; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध
गुन्हेगारी

पारेगावच्या बाप कंपनीतील धक्कादायक प्रकार; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविल्याच्या रागातून घडला प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कंपनीच्या प्राध्यापकासह चार जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र संवाद न्यूज

संस्थेची माहिती विद्यापीठाकडे विचारल्याचा राग आल्याने तरुणाला प्राचार्यांच्या दालनात अडीच तास डांबून ठेवत दमबाजी करण्यात आल्याने तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने विद्यार्थी बेशुद्ध पडला व त्याला पालकांच्या ताब्यात देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पारेगाव येथील बाप कंपनीच्या प्राध्यापकांसह काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनी संबंधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील बाप कंपनीमध्ये पाथर्डी तालुक्यातील हनुमान अण्णा गर्जे या बावीस वर्षे तरुणाने बीसीए साठीच्या प्रथम वर्षाकरिता ॲडमिशन घेतले होते. ॲडमिशन घेतेवेळी तेथील प्राध्यापकांनी मैसूर युनिव्हर्सिटीचे डिग्री प्रमाणपत्र आणि नोकरी लावण्याची हमी स्टॅम्प पेपरवर देण्याचे वचन दिले. त्यामुळे या विद्यार्थ्याने २० ऑगस्टला ६०,००० रुपये ॲडमिशनसाठी भरले होते. नियमित कॉलेज केल्यानंतर ३ नोव्हेंबरला त्याने प्राध्यापक रावसाहेब घुगे यांना शंभर रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर देत ॲडमिशन घेतेवेळी दिलेली आश्वासने लेखी स्वरूपात मागितली होती.

प्राध्यापक घुगे यांनी संबंधित स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवून घेतला वेळोवेळी मागणी करून देखील स्टॅम्प पेपर देण्यास नकार दिल्याने गर्जे याने बाप कंपनी पुणे व म्हैसूर विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आहे का अशी विचारणा मेलद्वारे विद्यापीठाकडे केली होती. त्यावर बाप कंपनी ही त्यांच्या अधिपत्याखाली नसल्याचे कळविण्यात आले होते.

माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारल्याचा राग आल्याने गर्जे याला शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्राध्यापक रावसाहेब घुगे, उप प्राध्यापक दीपक नागरे यांनी त्यांच्या दालनात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी ऋतुजा पुरी, सुषमा आव्हाड व श्रीकांत दुबे यांनी या विद्यार्थ्याला तू ईमेल कोणाच्या सांगण्यावरून पाठविले तुला कोण सपोर्ट करतो अशी विचारणा केली. त्यावर या विद्यार्थ्याने तब्येत बरी नसल्याचे कारण देत नंतर तुमच्या प्रश्नांची माहिती देतो असे सांगितले. मात्र वरील चौघा आरोपींनी ‘आज तू मेला तरी तुला जाऊ देणार नाही व तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करू’ अशी धमकी दिली. संबंधित विद्यार्थ्यांनी घरी जाऊ द्या अशी विनवणी करून देखील त्याला धमकी देण्याचा प्रकार साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. याशिवाय या सर्व प्रकारचे त्यांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग देखील केले त्यामुळे घाबरून हा विद्यार्थी तेथेच बेशुद्ध पडला.

तत्पूर्वी घाबरलेल्या अवस्थेत हा विद्यार्थी असताना आरोपींनी त्याच्याकडून त्याचे बहिणीच्या पतीचा नंबर घेऊन त्यांना संस्थेत बोलावून घेतले. संबंधित विद्यार्थी रात्री नऊ वाजता शुद्धीवर आल्यानंतर तो रुग्णालयात असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने दाजी कडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी संस्थेत आल्यानंतर प्राध्यापक रावसाहेब घुगे एक पुरुष आणि दोन महिलांनी धमकी देत या विद्यार्थ्याला बराच वेळ त्यांच्या ताब्यात दिले नाही. बऱ्याच वेळानंतर बेशुद्ध अवस्थेतील विद्यार्थ्याला घेऊन त्याचे दाजी सुदाम गीते संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात आले होते. तेथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयाने पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत रावसाहेब रामनाथ घुगे, श्रीकांत डूबे, सुषमा आव्हाड आणि ऋतुजा यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 170
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.