Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश मांस वाहतुकीची टीप थेट जिल्हा अन्वेषण विभागाला; स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाच्या कारवाई साडेआठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

गोवंश मांस वाहतुकीची टीप थेट जिल्हा अन्वेषण विभागाला; स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाच्या कारवाई साडेआठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

छोटा हत्ती आणि झायलो कारमधून सुरू होती गोमांस वाहतूक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/12/2022Updated:06/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे येथील बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोमांस वाहतुकीच्या टीप आता वरिष्ठांना दिल्या जाऊ लागल्या आहे. अशाच एका टीप वरून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई एक हजार किलो गोमांसासह साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला आहे.

शंकर चौधरी, संतोष लोंढे, भाऊसाहेब साळुंखे, विनायक चव्हाण व बबन बेरड या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना संगमनेरमधून जनावराच्या मांसाची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यांनी ही माहिती वस्तीवरील पथकाला देत कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पोलीस उपाधीक्षकांचा तपास पथकातील पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांना सोबत घेत कारवाईसाठी रवाना झाले.

स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जोर्वे नाका येथे सापळा लावत संकेत वाहनांची प्रतीक्षा सुरू केली. मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संशयित झायलो गाडी आणि त्या पाठोपाठ एक छोटा हत्ती येताना दिसला. कर्मचाऱ्यांनी झायलो गाडी अडवत त्याच्याकडे विचारणा सुरू करताच पाठीमागील छोटा हत्ती मध्ये असलेला चालकाने तेथून पलायन केले.

पथकाने वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना गोवंश जनावरांचे मांस आढळून आल्याने पोलिसांनी दोन्ही वाहने, त्यातील मांस आणि झायलो चालकास ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीमध्ये झायलो चालकाचे नाव सलमान नजीर शेख, पळून गेलेल्या छोटा हत्ती चालकाचे नाव बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी असे असल्याचे निष्पन्न झाले. तर छोटा हत्ती वाहनांमध्ये ४०० किलो मांस आणि झायलो मध्ये ६०० किलो मांस आढळून आले. तसेच दोन्ही वाहनांमधील मांस हे पळून गेलेला आरोपी बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.