Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य
पत्रकारिता

उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य

जिल्हा कार्यकारिणी करणार जाहीर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई

मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी अकोलेतील दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी प्रा. अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा मोठा विस्तार लक्षात घेत मराठी पत्रकार परिषदेने उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वातंत्र्य शाखा स्थापन केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी वैद्य यांची निवड करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी वैद्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

वैद्य परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असून ही जबाबदारी अन्य पत्रकारावर सोपविण्यात येत आहे. वैद्य यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. उत्तर नगरमधील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहूरी, राहाता तालुक्यातील परिषदेचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

वैद्य २५ वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध वर्तमानपत्रात काम केले. त्यांना आजपर्यंत पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील राज्य व जिल्हास्तरीय अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले.अकोले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, सेक्रेटरी, अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे. याशिवाय रोटरी क्लब अकोलेचे ते संस्थापक अध्यक्ष असून चौदा जिल्ह्यांच्या असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या पब्लिक इमेजचे चेअरमनपदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी पार पाडली.

अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द ग्रामपंचायतचे सरपंचपदही त्यांनी भूषविले आहे. अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी, रोटरी डिस्ट्रिक्टवर ते काम पाहत आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे सहशिक्षक म्हणून ते सेवेत आहेत.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 277
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.