Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू; मृतात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश
अपघात

सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू; मृतात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश

नासिकमध्ये दुर्दैवी अपघाताची मालिका सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिकच्या शिंदे-पळसे टोल नाक्यावरील एसटी बसची थरारक दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातातील मृतक महाविद्यालयीन विद्यार्थी असून ते नाशिकच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार आठ-नऊ विद्यार्थी स्विफ्ट कारने एका मित्राच्या विवाह सोहळ्यानिमित्त संगमनेरला आले होते.

विवाह सोहळा आटोपून सायंकाळच्या वेळी ते पुन्हा नाशिकला परतत असताना सिन्नरच्या मोहदरी घाटामध्ये गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कार विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या इनोव्हा आणि स्विफ्ट जाऊन धडकली. त्यामुळे विचित्र पद्धतीने झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला असून दुसऱ्या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात तीन मुली आणि दोन मुलांचा मृत्यू झालेल्यात समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. घटनास्थळी आलेल्या मदत पथकाने अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती.

अपघातात हर्षल बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे आणि अन्य दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड आणि इनोव्हा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 158
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.