Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सतार वादनाची मोहिनी; विद्यार्थ्यांसह शिक्षक मंत्रमुग्ध
क्रिडा व कला

सतार वादनाची मोहिनी; विद्यार्थ्यांसह शिक्षक मंत्रमुग्ध

पिंपरणे शाळेत उमटले सुमधुर सूर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

त्या अबोल तारा छेडल्यानंतर उमटलेले शब्द, बोल, ताल आणि लय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि हृदयाच्या तारा छेडल्या. ‘झणझण छेडल्या तारा, बरसती अमृतधारा’ याची साक्षात अनुभूती घेत उपस्थित विद्यार्थ्यांसह सुमारे दोन तास सगळेच मंत्रमुग्ध झाले. सतारीच्या त्या स्वर्गीय स्वरांची जादू उपस्थितांच्या मनावर कायमची कोरली गेली.

निमित्त होते विदुरजी कृष्णनाथ महाजन यांच्या सतारवादन कार्यक्रमाचे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय या उपक्रमशील शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालय शाळा समूह योजनेच्या वतीने आयोजित ‘सतारवादन आणि विद्यार्थी संवाद’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष कैलास काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद डांगे, किरण झंवर, मंजुषा नावंदर आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाजन यांनी सतारीची रचना, त्यावरील सप्तसुरांची मांडणी, तारा, खुंट्या,भोपळा या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सतारीचा इतिहास, भारतीय राग व संगीताचा परिचय महाजन यांनी विद्यार्थ्यांना करून देत सतारीवर सप्तसुरांची निर्मिती कशी होते, हेही स्पष्ट केले. अहिरभैरव, यमन हे राग विद्यार्थ्यांना वाजवून दाखविले.

विद्यार्थीदशेत इयत्ता आठवीत असताना प्रथमतः आपण सतारवादन ऐकलं आणि तेव्हापासून आपणही सतार शिकावी असा मनोदय केला. सतार शिकण्यासाठी आवश्यक वेळ मिळावा म्हणून बारावी नंतर पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळत असतानाही कला शाखेत पदवीसाठी प्रवेश घेतला असेही ते म्हणाले.

सतार वादनाचे शिक्षण आपले गुरु उस्ताद उस्मान खान, उस्ताद शहीद परवेज तसेच गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्याकडून घेतानाचे अनुभवही महाजन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महाजन यांनी समर्पक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी आग्रहाने त्यांना राग कफी व भैरवी वाजून दाखविण्यास सांगितले. विद्यार्थ्यांची ही फर्माईश देखील त्यांनी पूर्ण केली.

याप्रसंगी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष देशमुख म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे एक सत्संगच असतो. मानवाच्या तरल भावनांना स्पर्श करून आध्यात्मिक अनुभव संगीतामुळे आपल्याला मिळतो. संगीत सर्व प्राणीमात्रांना आनंद देणारे आहे. खोपोली येथील आश्रमामध्ये कार्यक्रमाचे निमंत्रणही महाजन यांना दिले. परिचय प्राचार्य डांगे यांनी करून दिला. आभार प्रा. किशोर बांगर यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 144
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.