Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आठवडाभरातील दुसरी कारवाई; तीन गावठी कट्टे, काडतुसांसह पाच जणांना पकडले
गुन्हेगारी

आठवडाभरातील दुसरी कारवाई; तीन गावठी कट्टे, काडतुसांसह पाच जणांना पकडले

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; आरोपीत संगमनेरच्या एकाचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2022Updated:10/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आठवडाभरात दुसऱ्यांदा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हारमध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले तीन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक केली आहे. आठवडाभरातील सततच्या दोन घटनांमुळे कोल्हार बुद्रुक गावठी कट्टे विक्रीचे शहर बनत चालले आहे, शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीने परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हार मध्ये तीन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसांसह दोन जणांना अटक केली होती. कोल्हार येथे काही लोक गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरातच दुसऱ्यांदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.

सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, विजयकुमार विटेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, रणजीत जाधव, संभाजी कोतकर, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथकाने शुक्रवारी दुपारी कोल्हार मधील गौतम नगर भागात पोलिसांनी गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी आलेल्यांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील सदानंद राजेंद्र मंतोडे, कोल्हारमधील प्रसन्न विलास लोखंडे, अशपाक उर्फ मुन्ना रफिक पटेल, श्रीरामपूर मधील दुर्गेश बापू शिंदे व हारून उर्फ राजू रशीद शेख या पाच जणांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि तीन जिवंत काडतूस आढळून आले. पथकाने या कारवाईत सुमारे ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला.

आरोपीं विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये काही जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 467
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.