Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समृद्धी महामार्गाच्या ‘या’ सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंजला लाईव्ह प्रक्षेपण
विकास

समृद्धी महामार्गाच्या ‘या’ सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंजला लाईव्ह प्रक्षेपण

पालकमंत्री विखे पाटलांकडून प्रक्षेपण कार्यक्रम पूर्व तयारीची पाहणी; दुपारी दोन वाजल्यानंतर वाहतूक सेवा खुली होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहे. या कार्यक्रमाचे शिर्डी इंटरचेंज येथून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने या प्रक्षेपण कार्यक्रमाची पूर्व तयारी, सोयी-सुविधांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी शिर्डी इंटरचेंज येथे पाहणी केली.

पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपूते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे आदी उपस्थित होते.

रविवारी सकाळी होणाऱ्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रमास महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवर लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पंधराशे ते दोन हजार‌ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी बंदीस्त मंडप उभारण्यात आला आहे.

लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी १२ बाय १८ फूट उंचीचे २ एलईडी उभारण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर दुपारी २ वाजेनंतर वाहतूक व दळणवळण सेवा सर्वसामान्यांसाठी खूली होणार आहे‌.

शिर्डी इंटरचेंज समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा इंटरचेंज

समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर दरम्यान २४ इंटरचेंज (प्रस्थान मार्ग) आहेत. यात शिर्डी इंटरचेंज सर्वात मोठा आहे‌. या इंटरचेंजवर १६ टोल नाके (मार्गिका) आहेत‌. या १६ मार्गिकेच्यावर मध्यभागी एकच आधारस्तंभ असलेली सर्वात मोठी छत्री (canopy) आहे. मनमाड-अहमदनगर, पुणतांबा-झगडे फाटा व सिन्नर-शिर्डी तीन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंज येथून छेदून जातात, अशी माहिती प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते यांनी दिली.

उड्डाणपूल आणि नदीवरील पुलाचे काम आव्हानात्मक

समृद्धी महामार्गात अहमदनगर हद्दीत मनमाड-दौंड रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल व गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूल हे सर्वात आव्हानात्मक काम होते. सदर काम वेळेत पूर्ण करण्याचे समाधान आहे. अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता यशवंत पाटील यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 154
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.