Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘या’ मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे; प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर संघटनेचे घंटानाद आंदोलन
आंदोलन

‘या’ मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे; प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर संघटनेचे घंटानाद आंदोलन

आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांना त्याच जागेवर पुनर्नियुक्ती देण्याची आंदोलकांची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/12/2022Updated:12/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

दोन महिन्याच्या कालावधीतच राज्याच्या आरोग्य आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची अनपेक्षितरित्या बदली करण्यात आली. बदलीनंतर त्यांना अद्यापही नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. मुंढे यांनी अल्पशा काळातच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पाऊले टाकली. राज्याच्या जनतेच्या माफक आणि सुदृढ आरोग्यासाठी मुंढे यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी घंटानाद आंदोलन केले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांना आरोग्य खात्यात आयुक्तपदाची जबाबदारी दिली. मात्र अवघ्या दोन महिन्यातच त्यांची पुन्हा तेथून बदली करण्यात आली. तसेच नवीन नियुक्ती अद्याप देण्यात आली नाही. मुंडे यांना पुनर्नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी हे घंटानाद आंदोलन केले.

राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी या खात्यात मुंढे यांची अत्यंत गरज आहे. धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आयुक्त तथा कुटुंब कल्याण मंडळाच्या संचालक पदाचा कार्यभार हाती घेताच दोन महिन्याच्या कालावधीत आरोग्य खात्यात मोठे फेरबदल घडवून आणले.

त्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली, गरिबांना मिळणाऱ्या सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे आदेश दिले. सरकारी दवाखान्याचा कायापालट करण्याचा आणि राज्यातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांनी काम सुरू केले होते. सरकारी दवाखान्यात डॉक्टरची उपस्थिती वाढविणे, मोफत सुविधा देणाऱ्या ओपीडीचे तास वाढविणे, वरिष्ठ डॉक्टरांनी रात्रीचे राहून तास वाढविणे, सरकारी रुग्णालयातून रुग्णाला खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यावर बंदी, सरकारी रुग्णालयात मोफत सुविधा मिळत असताना रुग्णाला खाजगी रुग्णालयात पाठवून आर्थिक लूट थांबविण्यासाठी त्यांनी उचललेली पाऊले यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात मुंढे यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली.

सोळा वर्षाच्या कार्यकालात मुंढे यांच्या आतापर्यंत एकोणवीस वेळा बदल्या करण्यात आल्या. मुंढे यांच्या ज्या-ज्या ठिकाणी बदल्या झाल्या त्या-त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा अल्पावधीतच ठसा उमटविला आहे. गरिबांसाठी आरोग्यदायी असलेल्या सरकारी रुग्णालयाचा कारभार त्यांच्या कार्यकाळात सुधारू लागल्याने वंचित, दुर्बल व गरीब घटकातील रुग्णांना आशेचा किरण दिसत होता.

त्यामुळे राज्य शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता मुंढे यांची पुन्हा आरोग्य आयुक्त पदावर नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सुरू केलेल्या घंटानात आंदोलनामध्ये अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शहर अध्यक्ष सचिन साळुंखे, तालुकाध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष आप्पा गुंजाळ, तालुका सचिव असिफ शेख, तालुका सहसचिव अनिल खर्डे, संतोष जेधे, महिला आघाडीच्या फर्जना शेख, दीपक साळुंखे, दत्ता चव्हाण आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 206
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.