Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा भरविण्याचा मान संगमनेरला ; डॉ. संजय मालपाणी
क्रिडा व कला

तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा भरविण्याचा मान संगमनेरला ; डॉ. संजय मालपाणी

पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेत तीस राज्यातून एक हजारावर योगासन खेळाडू सहभागी होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी संगमनेरला मिळाली आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत देशातील तीस राज्यांमधून एक हजारावर अधिक स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संगमनेरला पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला असून या माध्यमातून संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिली.

मालपाणी म्हणाले, जिल्हा व राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता संगमनेरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात पार पडत आहेत. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमुळे योगासन स्पर्धेचे क्रीडा संकुल आणि संगमनेर योगा खेळाडूंमुळे गजबजून जाणार आहे.

केंद्र सरकारने भारतीय प्राचीन परंपरेतील योगासनास खेळाचा दर्जा दिल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसार, योगासनाच्या स्पर्धांसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, योगासनांची निवड, निष्णात पंचांचे प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनामध्ये संगमनेरचे मोठे योगदान राहिले आहे. तसेच यापूर्वी योगासनांच्या राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धाही संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यामुळे स्पर्धा आयोजनाचा एक वेगळा ‘संगमनेर पॅटर्न’ विकसित झाला आहे. राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, सेक्रेटरी जनरल जयदीप आर्य यांच्या माध्यमातून आता राष्ट्रीय पातळीवरील तिसऱ्या स्पर्धेचे यजमानपद संगमनेरला मिळाले आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने योगा खेळाडूंसह जवळपास बाराशेहुन अधिक जणांची उपस्थिती राहणार असल्याने या सर्वांच्या निवासासह भोजन व स्पर्धा सरावाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या समित्या त्यासाठी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र पाडळकर, तांत्रिक संचालक रचित कौशिक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन मूर्ती या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय राज्य पातळीवरील अनेक जण स्पर्धेसाठी संगमनेरात उपस्थित राहणार असल्याचे मालपाणी म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर खेळविली जाणारी ही स्पर्धा योगासनांच्या वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये होणार आहे. त्यात पारंपारिक व कलात्मक प्रकारामध्ये एकेरी व दुहेरी तालात्मक प्रकारामध्ये दुहेरी आणि कलात्मक प्रकारांमध्ये सांघिक सादरीकरण होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 141
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.