Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासह पाच आवर्तनाचे नियोजन; रब्बीचे पहिले आवर्तन लगेचच सुरू
शेती व सहकार

भंडारदरा धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासह पाच आवर्तनाचे नियोजन; रब्बीचे पहिले आवर्तन लगेचच सुरू

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस मंत्री विखे पाटलांसमवेत आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 21, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नागपूर : भंडारदरा लाभक्षेत्रात रब्बी आणि उन्हाळी हंगामासह एकूण पाच आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सुचना महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन बुधवारी २१ डिसेंबर पासूनच सुरु करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले.

बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे विधानभवनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, कृषी विभागाचे अधिकारी जगताप, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अभियंता नान्नोर यांनी धरणातील पाणीसाठ्याबाबत सादरीकरण करुन बैठकीमध्ये पाणी परिस्थितीची आकडेवारी सादर केली. सद्य परिस्थितीत भंडारदरा आणि निळवंडे प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या वर्षी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला तसेच मागील वर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली. तसेच पाण्याची बचतही झाल्याचे समाधान बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले.

मंत्री विखे पाटील यांनी आगामी काळातील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करताना, लाभक्षेत्राला चार आवर्तनाचा लाभ कसा मिळेल याचे नियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या रब्बी हंगाम सुरु असून, या हंगामाकरीता दोन आवर्तनं आणि उन्हाळी हंगामाकरीता दोन स्वतंत्र आवर्तनं घेण्यास बैठकीत अनुमती देण्यात आली. रब्बी हंगामातील पहिलं आवर्तन 21 डिसेंबर पासूनच सुरु करण्याचे निर्देशही विखे यांनी दिले.

उन्हाळा हंगामातही दोन आवर्तनं करण्याचे नियोजन विभागाने करावे असे सुचित करुन आवर्तनातून होणाऱ्या पाणी बचतीमधून आवश्यकतेनुसार पाचवे आवर्तन करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. कालव्यांच्या आवर्तनाचे नियोजन करतानाच मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी संबंधितांना दिले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 130
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.