Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवकौठेची सुहानी कहांडळ क्रिकेटमध्ये करणार महिला संघाचे नेतृत्व
क्रिडा व कला

देवकौठेची सुहानी कहांडळ क्रिकेटमध्ये करणार महिला संघाचे नेतृत्व

१५ वर्षाखालील महाराष्ट्र महिला संघाच्या उपकर्णधारपदी निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची देवकौठेची असलेली सुहानी भारत कहांडळ हिची उपकर्णधारपदी निवड झाली असून रांची व जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या नॅशनल लिगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

भारत नवनाथ कहांडळ हे पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांची सुहानी कन्या आहे. लहानपणापासून सुहानीला क्रिकेटची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून भारत कहांडळ व चुलते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी तिला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले.

इयत्ता नववीमध्ये शिकणारी सुहानी ही सलामीची आक्रमक फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. सुहानी सध्या पिंपरी चिंचवड येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणीत ती पात्र ठरली. तत्पूर्वी अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याची चूक दाखवली आहे. पंधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात तिच्या निवडीबरोबर तिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे, चिंचोली गुरवची आयपीएल खेळाडू छाया सोनवणे, यांच्या पाठोपाठ देवकौठ्याची सुहानी कहांडळ वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद भूषवत आहे. हे संगमनेर तालुक्यासाठी आनंददायी आहे.

सुहानीच्या निवडीबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, भारतशेठ मुंगसे, भागवतराव आरोटे, सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, बाबासाहेब ओहोळ, राजेंद्र कहांडळ, जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, विश्वनाथ आरोटे, अनिल गाजरे, राजेंद्र मुंगसे, सुरेश मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे काशिनाथ कहांडळ, प्राचार्य हरिभाऊ दिघे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 171
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.