महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असलेल्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडल्या.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी सामूहिक खो-खो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. दुसऱ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्लो सायकल, कुस्ती स्पर्धा पार पडल्या. तर समारोपाच्या तिसऱ्या दिवशी संगीत खुर्ची, क्रिकेट, फनी गेम्समध्ये पोता शर्यत, तीन पायी शर्यत आदी स्पर्धा पार पडल्या. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसोबत मुलींनीदेखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत विशेष यश संपादित केले.
क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख व पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी रंगाचे हेलियम वायूतील फुगे आकाशात सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गडाख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, चंदनेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य कैलास राहणे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील खेळाचे महत्व आणि गरज यासंबंधी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रगतशील शेतकरी सुधाकर दवंगे, बजरंग पावसे हे सोमनाथ दवंगे यांनी सहकार्य केले. स्पर्धा समारोप कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी व्यक्त केले.
यावेळी देवगड देवस्थानचे विश्वस्त काशिनाथ पावसे, गणेश दवंगे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे, शालेय समितीचे अध्यक्ष बजरंग पावसे, डॉ. प्रमोद पावसे, डॉ. शांताराम वर्पे, उपप्राचार्य कैलास रहाणे, सुधाकर दवंगे, सोमनाथ दवंगे, जेष्ठ क्रीडा शिक्षक सुरेश राहाणे, श्रीमती शिला हांडे, वसंत नेहे, मदन माने, संतोष तातळे, सर्जेराव वाघ, दिनेश थोरात, अक्षय तोरकडी,अविषा भालेराव, किरण शेळके, शांताराम पवार, रविंद्र भालेराव आदिल सर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

