Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देश विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगात : डॉ.संजय मालपाणी
क्रिडा व कला

देश विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगात : डॉ.संजय मालपाणी

तिसर्‍या राष्ट्रीय योगासन स्पर्धेला संगमनेरमध्ये शानदार सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : योग साधना ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अखिल मानवजातीला भारतामुळे लाभलेले हे वरदान आहे. भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडलेले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले.

संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सुसज्ज क्रीडा नगरीत तिसर्‍या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ सोहळा आज पार पडला. याप्रसंगी डॉ. मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक व खेलो इंडियाचे निरीक्षक शब्बीर शिकलकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक, स्पर्धा व्यवस्थापक निरंजन मूर्ती, सतीश मोहगावकर, विश्व योगासन प्रतिनिधी अ‍ॅड. उमेश नारंग, डॉ. सी. व्ही. जयंती, पुखरंबम वीरप्रदास, शामल ता आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे आदी उपस्थित होते.

डॉ. मालपाणी म्हणाले, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाची संधी आम्हाला देऊन आमच्यावर खूप मोठा विश्वास राष्ट्रीय योगासन फेडरेशनने टाकला आहे. 29 राज्यांमधील 789 हून अधिक योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक खेळाडूला प्रत्यक्ष सुवर्णपदक मिळू शकत नाही. मात्र इथे त्यांना प्रचंड उपयुक्त ठरणारा अनुभव मिळेल. येथून प्रत्येक योगासनपटू अनुभवाचे, शिक्षणाचे, नाविन्याचे आणि निश्चयाचे सुवर्णपदक मात्र नक्कीच घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले.

येथून मिळणारे अनुभवाचे सुवर्णपदक त्यांच्या जीवनाचे सोने करणारे असेल. मन, मेंदू आणि मनगट यांचा उत्कृष्ट समन्वय साधण्याचे कार्य योगासनांच्या माध्यमातून होते. म्हणूनच योगाला यशदाता म्हटले जाते. जागतिक योगासन संघटनेचे अध्यक्ष योगर्षी स्वामी रामदेव महाराज व डॉ. एच. आर. नागेंद्र गुरुजी यांचे आशीर्वाद घेऊन उदित शेठ व डॉ. जयदीप आर्य यांच्या मार्गदर्शनात योगासन क्रीडा प्रकार जागतिक क्षितिजावर नेण्यासाठी सर्वांच्या साथीने आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात 29 राज्यांमधून आलेल्या सर्व खेळाडूंच्या पथकांचे मैदानावर शानदार ध्वजसंचलन झाले. डॉ. मालपाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण होताच योगासन गीताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्रुवच्या नृत्य पथकाने वंदे मातरमच्या तालावर नृत्य सादर केले. तृप्ती डोंगरे या मागील वर्षीच्या सर्वोत्कृष्ट योगासनपटूने स्पर्धेची ज्योत मशालीद्वारे प्रज्वलित केली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार रुपेश सांगे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.

बापू पाडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत भव्य-दिव्य आणि नीटनेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. ’खेलो इंडिया’चे निरीक्षक आणि उद्घाटक शब्बीर शिकलकर यांनी स्पर्धा सुरु झाल्याची अधिकृत घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदीमध्ये शीला बन्सल यांनी तर इंग्रजीमध्ये अंजली जाधव यांनी केले. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे राजेश पवार यांनी आभार मानले.

स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक यांनी आपला आवाज बसलेला असल्याने देहबोलीतून भाषण सादर केले, त्याला सर्व स्पर्धकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे दाद दिली. सकाळी 7 वाजता डॉ. संजय मालपाणी यांनी सर्व खेळाडूंचे ध्यान सत्र घेतले. खेळाच्या माध्यमातून जीवन योगमय करण्याचा हा आगळावेगळा पायंडा या स्पर्धेच्या माध्यमातून घातला गेला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 114
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.