Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ७४१६ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान…
शेती व सहकार

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ७४१६ शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान…

प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्य शासनाने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. माजी महसूल मंत्री विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून दुसऱ्या यादीमध्ये संगमनेर तालुक्यातील ७४१६ शेतकऱ्यांची नावे असून त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांचा या निर्णयांमध्ये मोठा पुढाकार होता. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ झाला.

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातत्याने नियमितपणे कर्ज भरण्यास प्राधान्य दिले. यावर्षीही कर्ज वसुलीची जिल्हा बँकेची परंपरा जपताना ९९.८०% कर्ज वसुली दिली. त्यामुळे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर योजनेचा लाभ मिळावा याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

यामुळे दुसऱ्या यादीत तालुक्यातील ७४१६ खात्यांची यादी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीचे जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमधील आधारे प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे.

यामुळे संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व शेतकरी बांधवांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 136
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.