Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत!
क्रिडा व कला

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत!

विविध पाच प्रकारांमध्ये सादरीकरण; रात्री घडते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्‍या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. २७ डिसेंबर पासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील २९ राज्यातील ७८९ योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीयस्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.

महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्‍या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

योगासनांचे पारंपरिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक (रिदमीक) दुहेरी सादरीकरण, सामूहिक सादरीकरण अशा एकूण पाच प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत. यातील बहुतेक सर्वच प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या योगासनपटूंनी पहिल्या दोन दिवसांत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

नीटनेटक्या आयोजनामुळे ही स्पर्धा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. एकाच वेळी चार मंचावर वेगवेगळ्या गटांचे सादरीकरण केले जात आहे. परीक्षण करणार्‍या सर्व पंचांना अत्याधुनिक आणि वेगवान इंटरनेट यंत्रणा पुरविण्यात आली आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या आवारामध्ये स्पर्धकांची स्वतंत्र निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. २९ राज्यांमधून आलेले सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पालकांनी येथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. खेळाडूंच्या व्यतिरिक्त १३५ प्रशिक्षक, पंच आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळणार्‍या ८० तज्ज्ञ व्यक्ती आणि १०० पालक यांच्यासाठीही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

चारही मंचावरील अत्याधुनिक आणि आकर्षक ध्वनी-प्रकाश यंत्रणा स्पर्धेला संस्मरणीय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ठरली आहे. दररोज दिवसभराची स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके, प्रसिद्ध ढोल पथकाची प्रस्तुती इत्यादीमुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा देशभरातील खेळाडूंना माहीत होत आहे. शिर्डी येथील साईतीर्थ स्पिरीच्युअल थीमपार्कच्या विनामूल्य भेटीची व्यवस्था स्पर्धकांसाठी करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 103
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.