Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनीमध्ये गीत संगीताचा मेधा ‘स्वरामृत’ संस्मरणीय
क्रिडा व कला

अमृतवाहिनीमध्ये गीत संगीताचा मेधा ‘स्वरामृत’ संस्मरणीय

सारंग भालकेच्या गायनाने कार्यक्रम ठरला रंगतदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला असून या सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत झालेल्या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले गायन व वादन हे संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमामुळे अमृतवाहिनीतील वातावरण संगीतमय झाले होते.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने गायन व वादन कलेची स्वरामृत म्युझिकल नाईट पार पडली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, झी मराठी सारेगमपचा उपविजेता सारंग भालके, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम. लोंढे, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, शितल गायकवाड, अंजली कन्नमवार, सुनीला मनोज कुमार, स्नेहल शेकदार, डंग मॅडम, प्रा. विलास शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेतील सर्व विभागांनी राज्य व देश पातळीवर आपल्या गुणवत्तेने लौकिक मिळवला आहे. संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मेधा महोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे. यामध्ये मागील पाच वर्षात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले असून चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. यावर्षीही हा महोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहे.

गायन व वादणाकरता ‘स्वरामृत’ हा स्वतंत्र कार्यक्रम झाला. यामध्ये गणेश वंदनाने सुरुवात झाली. तर न्यूडो स्कूलमधील चिमुकलीने गायलेले कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी या भावगीतेला भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेले विविध गीतांवरती वादन आणि मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादन याला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मेरे रश्के कमर, यारा तेरी यारी ,केसरिया या गीतांना विद्यार्थ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, फार्मसी, डी. फार्मसी, आयटीआय, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल यामधील विविध विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी केलेले वैयक्तिक गायन समूह गायन तसेच इंटरनॅशनल स्कूल व मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेले विविध वाद्यांचे वादन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. स्वागत विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य जोशी यांनी तर सूत्रसंचालन आशिष वर्पे यांनी केले.

 

सारंग भालकेने जिंकले सर्वांची मने

झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्पचा उपविजेता सारंग भालके यांनी केसरीया, यारीया, लखाबाई पोतराज आला भेटीला ही विविध गीते गायली, वादन आणि गायन करून उपस्थित सर्वांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.