Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन लाखाची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक अटकेत
गुन्हेगारी

दोन लाखाची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक अटकेत

पुणे एसीबीची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या तक्रार अर्जावरून तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी तसेच सदरचा अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली. प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखावर सेटलमेंट करणाऱ्या या उपनिरीक्षकाला एसीबीने तुरुंगाची हवा दाखविली आहे.

रोहित गणेश डोळस (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जासंदर्भात डोळस याने तक्रार अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी तसेच एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

मात्र तक्रारदाराने उपनिरीक्षक डोळस याला लाचेची रक्कम न देता पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीने यासंदर्भात २ डिसेंबरला पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी लाचखोर पोलीस उपनिरीक्षक डोळस याच्या विरोधात पुणे एसीबीने लाच मागणीचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. आरोपी रोहित डोळस याला अटक करण्यात आली असून पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पुढील तपास करत आहेत.

पुणे एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वऱ्हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 124
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.