Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर-सुकेवाडी येथे दरोडा घालणारे दोन दरोडेखोर नगर एलसीबीच्या पथकाने पकडले
गुन्हेगारी

संगमनेर-सुकेवाडी येथे दरोडा घालणारे दोन दरोडेखोर नगर एलसीबीच्या पथकाने पकडले

शहर पोलीस मात्र खून आणि दरोड्याच्या तपासात अपयशी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/01/2023Updated:02/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : संगमनेर शहरालगत असलेल्या पावबाकी, सुकेवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघा दरोडेखोरांना पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. असे असले तरी स्थानिक शहर पोलिस मात्र या दरोड्यासह खूनाच्या अन्य एका प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत.

संगमनेरातील दरोड्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस पथक परिश्रम करत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांनी संगमनेरातील दरोड्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळते. याशिवाय या गुन्हेगारांच्या टोळीने जिल्ह्यात अन्यत्र दरोडे घातल्याची माहिती पथकाला मिळाली आहे.

नगर एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात आपल्या विशेष पथकाला गुन्हेगार पकडण्याच्या मोहिमेवर पाठविले. पथकातील कर्मचारी वेशांतर करत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगाव रोड परिसरातील माळरानावर संशयित आरोपींचा शोध घेत होते. यावेळी त्यांना एका लिंबाच्या झाडाखाली सहा सात व्यक्ती बसलेल्या दिसून आल्या. बसलेल्या लोकांना वेशांतर केलेल्या पथकाची चाहूल लागल्याने ते माळरानावर पळू लागले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत त्यातील दोघांना पकडण्यात यश मिळविले तर त्यांचे अन्य साथीदार डोंगरातील झाडाझुडपांचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पथकाने पकडलेल्या दोन संशयीतांपैकी एकाचे नाव रावण उर्फ जनक नादर चव्हाण व दुसऱ्याचे नाव दिलीप नादर चव्हाण दोघे राहणार सालेवडगावरोड, चिचोंडी पाटील, ता. नगर, जि. अहमदनगर असे आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींकडे पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता आरोपींनी त्यांच्या साथीदारासमवेत संगमनेर शहरालगतच्या पावबाकी, सुकेवाडी येथे घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने या दरोडेखोरांना पकडल्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या दरोडे, चोऱ्या, घरफोड्या याचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरोड्यातील दोघा आरोपींना पकडणाऱ्या नगरच्या स्थानिक गुन्हे शोध पोलिसांच्या विशेष पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकीर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, सचिन आडबल, भीमराज खर्से, दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका दरेकर तसेच चालक हेड कॉन्स्टेबल बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे, व भरत बुधवंत यांचा समावेश होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 169
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.