Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तोडफोड आणि जागेच्या वादातून शहर पोलीस ठाण्यात बावीस जणांविरोधात गुन्हे
गुन्हेगारी

तोडफोड आणि जागेच्या वादातून शहर पोलीस ठाण्यात बावीस जणांविरोधात गुन्हे

संगमनेर तालुक्यातील खांडगावचा प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

आपसातील जागेचे वाद आणि सलूनचे दुकान तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार वाद झाले. पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या या वादामध्ये दोन्ही कुटुंबीयातील बावीस जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. राजेंद्र यादव सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गावी गेलेले असताना जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन सूर्यभान गुंजाळ, अजित बाबासाहेब गुंजाळ, महेश नामदेव गुंजाळ, अमित बाबासाहेब गुंजाळ यांच्यासह इतर चार ते पाच महिलांनी गैर कायद्याची मंडळी गोळा करत फिर्यादीच्या घराशेजारील मातीचे बांधकाम केलेले व वरून पत्रा असलेले हेअर सलून दुकान तोडून नुकसान केले. तसेच घरासमोरील बदामाचे झाड तोडत त्याचे नुकसान केले. याशिवाय संडास, बाथरूम आणि नळ कनेक्शनचेही तोडून नुकसान केले. याशिवाय शिवीगाळ करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक पवार करत आहे.

याच अनुषंगाने दुसरी परस्परविरोधी फिर्याद जनार्दन गोविंद गुंजाळ यांनी राजेंद्र यादव सस्कर, संजय यादव सस्कर, सुधाकर यादव सस्कर, प्रसाद संजय सस्कर, पुष्पा कमलाकर सस्कर, सुषमा राजेंद्र सस्कर व सुधाकर यादव सस्कर यांचा मुलगा (नाव माहीत नाही) यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन गुंजाळ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गैर कायद्याची मंडळी गोळा करुन आलेल्या आरोपींनी गुंजाळ यांची भावजई ज्योती संजय गुंजाळ व इतर सूना यांना म्हणाले की, ही जागा आमची आहे. येथे काही करायचे नाही असे म्हणत फिर्यादी, फिर्यादीची भावजई आणि सुनांना शिवीगाळ करुन तुमच्याकडे पाहतो असा दम दिला. या तक्रारीवरून देखील पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक धादवड हे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 315
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.