Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञात दोघा व्यक्तींनी दोन अल्पवयीन मुलींना पळविले
गुन्हेगारी

अज्ञात दोघा व्यक्तींनी दोन अल्पवयीन मुलींना पळविले

अकोले आणि राजुरमधील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अकोले : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा प्रकार अकोले तालुक्यात समोर आला आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या गायब झालेल्या मुलींचा शोध घेत आहेत.

अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कापड दुकानात काम करणारी अल्पवयीन मुलगी अनपेक्षितरित्या गायब झाली आहे. तर राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातील मंदिरामध्ये हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसात तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने व त्यांना अज्ञात व्यक्तीने पळविले असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केल्यामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचे आव्हान अकोले आणि राजुर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावामधील एक मुलगी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त हरिपाठ करण्यासाठी गेली होती.

हरिपाठ संपल्यानंतर मंदिरातील सर्व लोक घरी पोहोचले. परंतु सदर मुलगी घरी आली नाही. घरच्यांनी तिचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यामुळे सदर मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची शंका तिच्या घरच्यांना आली. या संदर्भात मुलीच्या आजीने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला (वय १७ वर्षे ८ महिने) पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत अकोले शहरातील एका कापड दुकानात कामास असलेल्या मुलीला तिच्या घरच्यांनी सकाळी दुकानात सोडले. मुलगी रात्र झाली तरी घरी आली नाही. म्हणून घरच्या मंडळीनी सदर कापड दुकानात चौकशी केली असता कापड दुकान मालकाने सांगितले की, सदर मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर गेली आहे.

बेपत्ता झालेल्या या मुलीचा तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु मुलगी आढळून आली नाही.

त्यामुळे सदर मुलीला कोणीतरी पळून नेले असावे, असा तिच्या नातेवाईकांचा संशय आहे. या संदर्भात मुलीच्या आईने अल्पवयीन मुलीस (वय १६ वर्षे १ दिवस) हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे अशी फिर्याद दिली आहे. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 304
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.