Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवगड विद्यालयात आंतरशालेय विज्ञान गणित प्रदर्शन
क्रिडा व कला

देवगड विद्यालयात आंतरशालेय विज्ञान गणित प्रदर्शन

प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या ७२ उपकरणांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयांमध्ये आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या ७२ उपकरणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजच्या प्रगतीच्या, धावपळीच्या विज्ञान युगात तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तरं त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने देवगड विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच पार पडलेले विज्ञान गणित प्रदर्शन होय.

विद्यार्थ्यांमधील सुप्त विज्ञानवादी विचारांना चालना मिळण्यासाठी, त्यांच्यातही एक शास्रज्ञ लपलेला आहे याची त्यांना जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचा शुभारंभ देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश पावसे यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आला.

पंचक्रोशीतील हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, शिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत प्रदर्शनाला भेट देत उपक्रमांची माहिती घेतली. परीक्षक म्हणून भारत सातपुते, बाळासाहेब राऊत, प्रदीप कांबळे सर यांनी काम बघितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प. पू. गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद डांगे, भारत सातपुते, सरपंच सुभाष गडाख, हनुमान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गणपत पावसे, चंदनेश्वर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उगले मॅडम, बाळासाहेब राऊत, गुळवे सर, सुरेश राहाणे, यादवराव पावसे, दत्तात्रय पावसे, प्रदीप कांबळे, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश पावसे, श्रीमती हांडे मॅडम, गणित विषय शिक्षक नेहे सर, माने सर, तातळे सर, विज्ञान विषय शिक्षक वाघ सर, थोरात सर, तोरकडी सर, श्रीमती भालेराव मॅडम, किरण शेळके, शांताराम पवार, रवींद्र भालेराव यांनी प्रयत्न केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 180
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.