Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकुरमधील वाद उफाळला; घरातील व्यक्तींवर हल्ला करत महिलांचा विनयभंग
गुन्हेगारी

साकुरमधील वाद उफाळला; घरातील व्यक्तींवर हल्ला करत महिलांचा विनयभंग

घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून सुरू झालेला साकुरमधील वाद नववर्षाच्या सुरुवातीपासूनच उफाळून आलेला असताना आता थेट घरातील व्यक्तीवर हल्ले करून विनयभंग करण्यापर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाद्वारे सुमारे १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष बाजीराव खेमनर (निवृत्त कृषी अधिकारी), बुवाजी भागा खेमनर, किशोर बाजीराव खेमनर, इसाक अब्दुल पटेल, विश्वजीत सुभाष खेमनर, बबलु ऊर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे, सद्दाम मन्सुर चौगुले यांच्यासह आणखी दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून गुरुवारी दुपारी घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी आरोपींनी गैर कायद्याची मंडळी गोळा करत फिर्यादी आणि तिचे पती तसेच इतर नातेवाईक साकुर गावचे प्रमुख शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर यांच्या समर्थनार्थ संगमनेर येथे गेले असल्याचा कारणावरून फिर्यादी आणि तिच्या पतीचा जातीवाचक उल्लेख करत आरोपींनी तुम्ही गावचा कारभार कसा चालवता हे आम्ही पाहतो, तुमचे गावातील संपूर्ण जात नष्ट करून टाकू. अशी जातीवाचक शिवीगाळ करून आरोपींनी फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसत फिर्यादीस तसेच फिर्यादीचे पतीस व इतर नातेवाईकांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली व घरात असणारी फिर्यादी व इतर बायका यांची साडी ब्लाऊज धरून ते फाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांना घराबाहेर ओढत आणले व जाताना पुन्हा शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर यांच्या मागे दिसलात तर तुमची वस्ती जाळून टाकु अशी धमकी दिली.

यावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 383
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.