Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हासदादा पवार यांना तर डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर
शेती व सहकार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हासदादा पवार यांना तर डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर

प्रतिष्ठेच्या भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे स्मृति पुरस्कारांची घोषणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास तर सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व डॉ. राजीव शिंदे यांनी दिली आहे.Advt

स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त पुरस्काराविषयी माहिती देतांना आ. डॉ. तांबे व राजीव शिंदे म्हणाले, दरवर्षी कृषी , शिक्षण, साहित्य, संशोधन, सहकार, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विविध मान्यवरांना जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते.

कृषी, संशोधन, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार गौरविल्या गेलेल्या जळगांवच्या जैन उद्योग समूहाने शेतकर्‍यांच्या जिवनात आनंद निर्माण करतांना कृषी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, अन्न व फळ प्रक्रिया या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तसेच जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जीवनकार्यावरील पहिले ऑडीओ गाईडेड म्युझियम ‘गांधीतीर्थ ‘ निर्माण केले आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते असलेले ज्येष्ठ नेते मा. आ. उल्हासदादा पवार यांनी संत साहित्य, संगीत, समाजकारण, सहकार, पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारांर्थींची निवड कृषी भूषण विजय अण्णा बोर्‍हाडे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात यांच्या निवड समितीने केली आहे. काँग्रेसचे वरीष्ठ नेते व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भव्य कार्यक्रमात राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहेत. यावेळी वैचारिक प्रबोधनासह दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रमांचे ही आयोजन केले जाणार असल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 319
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.