Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधानांकडून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंचे कौतुक!
क्रिडा व कला

पंतप्रधानांकडून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंचे कौतुक!

राष्ट्रीय युवा दिन; हुबळीतील कार्यक्रमात महाराष्ट्र संघाची योगासने
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा ‘राष्ट्रीय युवा दिन’ यंदा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी गाजवला. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविणार्‍या महाराष्ट्र संघाने योगासनांचे रोमहर्षक सादरीकरण करीत पंतप्रधानांसह उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली. या सोबत ध्रुवच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ओडिसी नृत्यप्रकाराने या कार्यक्रमाची रंगत वाढली. यावर्षीच्या युवा दिवस कार्यक्रमात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमानही पटकाविला.

भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विविध राज्यातील युवकांच्या सहभागाने साजर्‍या होणार्‍या या कार्यक्रमात त्या-त्या राज्यातील विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे कर्नाटकातील हुबळी येथे भारत सरकार व कर्नाटक राज्याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थीनींनी शास्त्रीय नृत्य प्रकारातील ओडिसी नृत्यासोबत योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह वेगवेगळ्या विभागांच्या मंत्री, अधिकारी, निमंत्रित व हजारों युवकांच्या उपस्थित साजर्‍या झालेल्या या कार्यक्रमात नुकत्याच संगमनेर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या महाराष्ट्राच्या योगासन संघाला राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली.

या कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करणार्‍या महाराष्ट्र संघात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या रुपेश सांगे, निबोध पाटील, सुमित बंडाळे, प्रीत बोरकर, प्रणव साहु, वैष्णव कोरडे, पवन चिखले, आदित्य जंगम, रुद्राक्षी भावे, गीता शिंदे, तन्वी रेडिज, स्वरा गुजर यांचा तर ओडिसी नृत्य प्रकारात वृष्टी पटेल, जीया बाफना, आदिती लाहोटी व सौम्या जोशी यांचा सहभाग होता. योग शिक्षक मंगेश खोपकर, विष्णु चक्रवर्ती यांनी योगासनपटूंना तर सोनाली महोपात्रा यांनी ओडिसी नृत्य सादर करणार्‍या विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. प्राचार्या अर्चना घोरडे यांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करवून घेतली. या कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी व व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या शानदार कार्यक्रमात योगासन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदित सेठ व सेके्रटरी जनरल डॉ.जयदीप आर्य यांनी महाराष्ट्राच्या योगासन संघाला राष्ट्रीय योगासन महासंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. योगासनांची रोहर्षक प्रात्यक्षिके सुरु असतांना खुद्द पंतप्रधानांनी अनेकवेळा टाळ्या वाजवून मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. हा क्षण महाराष्ट्रासाठी, ध्रुव ग्लोबल स्कूलसाठी अत्यंत अभिमानास्पद असाच होता.

डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष – राष्ट्रीय योगासन महासंघ.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 397
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.