Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविला चिमुकल्याचा जीव
अपघात

बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविला चिमुकल्याचा जीव

शहरालगतच्या देशमुख नगरमधील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : घराच्या पोर्चमधून चार वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या जबड्यात पकडत ओढून नेणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून आपल्या जीवावर उदार होत आईने या चिमुकल्याची सुटका केली. समोर साक्षात बिबट्या असताना मातेने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले.

संगमनेर शहरालगतचा गुंजाळवाडी मधील देशमुख नगरमध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जखमी असलेल्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. लोकवस्तीत आलेले हे बिबटे आता माणसांवर देखील हल्ले करत आहेत. त्यामुळे माणसांवर हल्ले करणारे बिबटे पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.

देशमुख नगरमध्ये सिमेंट पोल फॅक्टरी जवळ असलेल्या कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढले आहेत. त्यामुळे बिबट्यांना दडून बसण्यास येथे छोटेसे जंगल निर्माण झाले आहे. या लगतच मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. येथे राहणाऱ्या संभाजी पवार त्यांच्या घराजवळील पोर्चमध्ये खेळणाऱ्या चार वर्षे वयाच्या शिवमवर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याची मान आपल्या जबड्यात पकडून बिबट्याने त्याला समोरच्या मोकळ्या मैदानात आणले. यावेळी तेथे जवळच बसलेल्या शिवमच्या आजी आणि चुलतीचा निदर्शनास ही बाब आली. त्यांनी केलेल्या आरडाओरडीमुळे चिमुकल्याची आई बिबट्याच्या पाठीमागे धाऊ लागली.

तिने जीवावर उदार होत बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडविले. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या चिमुकल्याच्या हनुवटी जवळ, पंजामुळे छातीला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. चिमुकल्याला तातडीने खाजगी रुग्णालयात व तेथून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी शुभमच्या हनुवटीला सात ते आठ टाके पडले आहेत.

दरम्यान घटनास्थळी वनक्षेत्रपाल सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या वनविभागाच्या पथकाने शोध घेतला असता त्यांना झुडूपात लपलेला बिबट्या दिसला मात्र, संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी झुडपामध्ये जेसीबी घातल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या शोधार्थ परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या दिसून पसार झाला होता. बिबट्याने चिमुकल्यावर केलेल्या या हल्ल्यामुळे गुंजाळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 715
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.