Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रशासन पर्समध्ये ठेवणाऱ्या महिलेने नोकरीत कायम करण्यासाठी शिक्षिकेला सहा लाखाला गंडविले
गुन्हेगारी

प्रशासन पर्समध्ये ठेवणाऱ्या महिलेने नोकरीत कायम करण्यासाठी शिक्षिकेला सहा लाखाला गंडविले

संगमनेरमधील घटना; पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : नोकरीमध्ये कायम करण्याची ऑर्डर मिळवून देण्यासाठी घटस्फोटीत महिला शिक्षिकेकडून ५ लाख ८० हजार रुपये घेऊन ऑर्डर न देणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमिना सलीम शेख रा. कुरण ह. मु. मालदाड रोड, संगमनेर असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे. फसवणूक झालेल्या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून अमिना शेख हिच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, शहरातील जोर्वे रोडवरील उस्मतनगरमध्ये राहणाऱ्या महिला शिक्षिका शहरातील एका शाळेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून नोकरीस आहे. पतीसोबत घटस्फोट झाल्याने संबंधित शिक्षिका आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहावयास असून ती काम करत असलेल्या शाळेमध्ये अनुदानित शिक्षकेची जागा रिकामी झाली होती. या रिक्त पदावर नेमणूक होण्यासाठी महिला शिक्षिकेने २०२१ मध्ये शाळेकडे अर्ज दाखल केला होता.

त्यानंतर संस्थाचालकांनी यासाठी आवश्यक शिफारशीसह शिक्षकेकडील कागदपत्रे घेऊन यासंबंधीची फाईल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविली होती. याची माहिती आरोपी महिला अमीना सलीम शेख हिला झाल्यानंतर तिने शिक्षिकेच्या भावास फोन करून संबंधित नोकरीची ऑर्डर जिल्हा परिषदेकडून काढून देण्याचे आश्वासन दिले.

भावाने ही माहिती शिक्षिकेला दिल्यानंतर अमिना शेख हिने शिक्षिकेला शहरातील हॉटेल अंबरमध्ये भेटण्यास बोलविले होते. तेथे आरोपी महिला, शिक्षिका आणि तिच्या भावासोबत झालेल्या चर्चेनंतर नोकरीची ऑर्डर लवकरात लवकर काढून देण्याचे आश्वासन आरोपी महिलेने शिक्षिकेला दिले.

त्यानंतर अमिना शेख हिने तक्रारदार शिक्षिकेशी संपर्क करत ठरलेल्या कामासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे मिळाल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. आरोपी महिलेवर विश्वास ठेवत तक्रारदार शिक्षिकेने गुगल पे द्वारे आरोपी महिलेला एक लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने अमिना शेख हिने आत्तापर्यंत तक्रारदार शिक्षकेकडून तब्बल पाच लाख ऐंशी हजार रुपये घेतले आहेत. तिच्याकडे नोकरीत कायम करण्याचा ऑर्डरबाबत विचारणा केली असता, तिने शिक्षकेला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच माझे कोणीच काही करू शकत नाही, संपूर्ण प्रशासन मी माझ्या पर्समध्ये ठेवते. या भाषेत बोलत अपमानास्पद वागणूक दिली. तसेच अनुदानित जागेवर कायमस्वरूपी नोकरीची ऑर्डर मिळवून दिली नाही.

त्यामुळे आरोपी अमिना शेख हिच्या विरोधात तक्रारदार महिला शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 387
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा…

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.