Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लॉजवरील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकांचा छापा
गुन्हेगारी

लॉजवरील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकांचा छापा

एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : शहरानजीकच्या वडगाव पान येथील एका लॉजवरील वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकांनी सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. कारवाई पोलिसांना येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे संगमनेरमध्ये सर्रासपणे लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी तिघांवर अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

शहरालगतच्या वडगाव पान शिवारामध्ये वडगाव पान फाटा ते कोपरगाव रोडलगत असलेल्या हॉटेल विशाल गार्डनच्या मागे साईमाया लॉजमधील खोलीत हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांना मदतीला घेत सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छापा टाकण्यात आला.

कारवाई दरम्यान येथे काही परप्रांतीय महिला हा व्यवसाय करताना आढळून आल्या असल्याची माहिती मिळते. तसेच बदलापूर (ठाणे) येथील एक महिला व आरोपी या महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी कुंटणखाना चालविण्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मोबाईलसह एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार विष्णू कान्हु आहेर यांच्या तक्रारीवरून प्रतीक बाळासाहेब चत्तर, खेमराज कृष्णराज उपाध्याय (दोघे रा. वडगाव पान, संगमनेर) यांच्यासह संगमनेरमधील एका महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 936
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.