Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हैदराबाद, नगर व्हाया संगमनेर… एका संदेशाने ते दोघेही पकडले गेले
गुन्हेगारी

हैदराबाद, नगर व्हाया संगमनेर… एका संदेशाने ते दोघेही पकडले गेले

मालपाणी हॉस्पिटल जवळ महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नातील एक आरोपी पोलिसांनी पकडला; दुसरा फरार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 21, 2023Updated:January 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उपनगरातील मालपाणी हॉस्पिटल जवळील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. एटीएम मशीनवर बसविलेल्या डिजिटल सुरक्षा यंत्रणेमुळे लगेचच चोरीच्या प्रयत्नातील दोघा आरोपीपैकी एक आरोपी घटनास्थळापासून काही अंतरावर पकडण्यात पोलिसांना यश आले. तर दुसऱ्या आरोपीला दुपारी उशिराने ताब्यात घेण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये गुन्हेगारांनी कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले असून चोरी सारख्या घटना दररोज नित्यनेमाने घडत आहे. शहर व तालुक्यामध्ये दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला असून चोरांचा शोध लावण्यास पोलीस अपयशी ठरत आहेत. सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वेळेत माहिती मिळाल्याने आणि पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लंपास करण्यापूर्वीच एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान जाणता राजा मैदानाजवळील मालपाणी हॉस्पिटल जवळ असलेले लोक वस्तीतील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन दोन चोरटे लोखंडी रॉडसारख्या टामीच्या साह्याने त्यातील रोकड लंपास करण्याच्या उद्देशाने फोडत होते.

मात्र बँकेने बसविलेल्या डिजिटल सुरक्षेने एटीएम मशीन फोडले जात असल्याचा संदेश थेट आपल्या हैदराबाद येथील मुख्यालयाला दिला. हैदराबाद येथील अधिकाऱ्यांनी तातडीने ही माहिती अहमदनगर जिल्हा पोलिसांना कळविली. तेथून थेट शहर पोलिसांना संदेश देण्यात आला.

रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी फटांगरे यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस पथक पाठविले. पोलिसांची चाहूल लागल्याने दोन्ही आरोपी तेथून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करत त्यापैकी एकाला पकडले. तर दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी घेतलेला आरोपीची चौकशी केल्यानंतर दुसऱ्या आरोपीचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळाला. पोलीस पथकाने दुसऱ्या आरोपीलाही उशिराने ताब्यात घेतले आहे.

मंगेश बाळु गांगुर्डे (वय २० वर्षे, रा. चास, ता. अकोले) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून या संदर्भात महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अक्षय संजय जवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात मंगेश बाळु गांगुर्डे याच्यासह त्याच्या अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 630
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा…

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.