Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देणाऱ्या एसटी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार
आंदोलन

विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देणाऱ्या एसटी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

वारंवार आंदोलने करून टाळाटाळ करणाऱ्या एसटी महामंडळाविरोधात छात्रभारतीचा एल्गार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : कोरोना साथ रोगामध्ये एसटी महामंडळाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक ठिकाणच्या बस सेवा बंद केल्या आहेत. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी, अद्यापही एसटी महामंडळाने या सेवा पूर्ववत केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार आंदोलने करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आता थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या छात्रभारती संघटनेने दिला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने आगार व्यवस्थापकांना वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली, सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी महामंडळाकडून वारंवार उडवा उडवीची उत्तरे दिली. गेली खोटी आश्वासने दिली गेली.
एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे विशेषत: मुलींचे शिक्षण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांना एसटी बसच्या पासचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने आपला जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास करावा लागत आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहावे लागत आहे. यामुळे मेस आणि खोली भाड्यासाठी त्यांना हजारो रुपये मोजावे लागत आहे.
पठार भागासह तालुक्यातील अनेक गावांमधील एसटी बस सेवा बंद आहे. राजकीय कार्यक्रम, दिंड्या सहलीसाठी एसटी बसेस गेलेल्या आहेत. त्यामुळे गाड्या उपलब्ध नाहीत, अशी कारणे वारंवार दिली जात आहेत. काही ठिकाणच्या बस फेऱ्या अचानक बंद केल्या जात आहेत. या बस फेऱ्या आणि मुक्कामी बसेस तातडीने सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत असून या नुकसानीस आगार प्रशासन जबाबदार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी दोन दिवसात एसटी प्रशासनाने विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा या मागणीसाठी छात्रभारती संघटनेच्यावतीने संविधानिक मार्गाने आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आगार व्यवस्थापकांना निवेदन देतेवेळी छात्रभारती संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सदस्य गणेश जोंधळे, ओंकार अभंग, सुनील खरात, साहिल खरात, पृथ्वीराज खरात, विशाल जगताप, आवजीनाथ गायकवाड, सिद्धांत धाकतोडे, रूपाली घुले, मनीषा फटांगरे, राणी घुले, अनुष्का घुले आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 197
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.