Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोंबड्यांची शिकार करताना बिबट्याने केला शेतकऱ्यावर हल्ला; उपचारासाठी अहमदनगरला हलविले
अपघात

कोंबड्यांची शिकार करताना बिबट्याने केला शेतकऱ्यावर हल्ला; उपचारासाठी अहमदनगरला हलविले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राहाता : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी कोंबड्याच्या जाळीमध्ये शिरलेल्या बिबट्याने कोंबड्यांसोबतच शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे समोर आला आहे. जखमी शेतकऱ्यावर शिर्डीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे.

बबन बाजीराव ढगे (वय ६५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ढगे नेहमीप्रमाणे झोपलेले होते. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या जाळीतील कोंबड्या जास्त आवाज करू लागल्याने त्यांनी कोंबड्यांच्या जाळीकडे धाव घेतली. जाळी जवळ गेल्यानंतर त्यांना कोंबड्यांच्या जाळीमध्ये बिबट्या शिरला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने जाळीचा दरवाजा उघडला. मात्र बिबट्याने लगेचच त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा हात आपल्या जबड्यात पकडला.

ढगे यांचा हात जबड्यात पकडून बिबट्या त्यांना फरफटत घेऊन जात असताना त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मुलगा आणि सून घराबाहेर आले. त्यांनी ढगे यांना बिबट्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. ढगे यांच्या हाताला बिबट्याने चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या जखमातून रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिर्डी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे पाठविण्यात आले.

ढगे यांच्याकडील जवळपास शंभर कोंबड्याचे नुकसान झाले असून या नुकसानीचा वनविभागाने तातडीने पंचनामा करत ढगे यांना भरपाई देण्याची व बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 399
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.