Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंधरा वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महिलेला नाशिकमधून अटक
गुन्हेगारी

पंधरा वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महिलेला नाशिकमधून अटक

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिकमधून एका 32 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पंधरा वर्षे वयाच्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या विवाहित महिलेवर असून तिच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
दारू आणि अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन या मुलाला लावत महिलेने त्याचे शोषण केले. तसेच स्वतःचे व मुलाचे काही अश्लील व्हिडिओ देखील तिने बनविले असल्याचे म्हटले आहे. या महिलेने पीडित अल्पवयीन मुलाशी शारीरिक संबंध ठेवले तसेच तो सातत्याने संपर्कात राहावा यासाठी तिने त्याला वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईलदेखील घेऊन दिला होता. त्याद्वारे हे दोघे सातत्याने संपर्कात होते.
पीडित अल्पवयीन मुलगा हा कल्याण येथील राहणारा असून या मुलाची आत्या नासिक येथे राहते. त्यामुळे त्याचे आत्याकडे येणे जाणे असल्याने त्याची या महिलेची ओळख झाली होती. संबंधित महिला ही मुलाच्या कुटुंबाच्या देखील ओळखीची असल्याने तिने या ओळखीचा गैरफायदा घेत मुलासोबत ओळख वाढविली. त्याला दारू पिण्याचे व अश्लील व्हिडिओ बघण्याचे व्यसन लावले. तसेच नाशिकला बोलावत त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नसल्याने तसेच तो सातत्याने फोनवर बोलत या महिलेशी बोलत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यामुळे या महिलेचो मुलासोबतची वागणूक पालकांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या शिक्षकांची मदत घेतली. शिक्षकांनी या मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने महिलेसोबत असलेल्या शारीरिक संबंधाची माहिती शिक्षकांना दिली. पालकांना याबाबत माहिती झाल्यावर त्यांनी संबंधित महिलेला या मुलापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र तरी देखील ही महिला विविध कारणाने त्या मुलाशी सातत्याने संपर्क करत त्याला भेटत असायची.
त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांनी सोमवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर त्या महिलेला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या महिलेवर बाललैंगिक शोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 457
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.